Redmi Note 10T च्या किंमतीचा खुलासा; 20 जुलैला होणार भारतात लाँच

By सिद्धेश जाधव | Published: July 14, 2021 02:37 PM2021-07-14T14:37:36+5:302021-07-14T14:39:08+5:30

Redmi Note 10T 5G Price Launch: Redmi Note 10T 5G हा स्मार्टफोन Redmi Note 10 5G आणि Poco M3 Pro 5G चा रिब्रँड व्हर्जन आहे, अशी चर्चा आहे.

Redmi note 10t 5g price in india leaked  | Redmi Note 10T च्या किंमतीचा खुलासा; 20 जुलैला होणार भारतात लाँच

Redmi Note 10T च्या किंमतीचा खुलासा; 20 जुलैला होणार भारतात लाँच

googlenewsNext

शाओमी भारतातील रेडमी सीरिजमध्ये पहिला 5G स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन Redmi Note 10T 5G नावाने भारतात 20 जुलैला लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन Redmi Note 10 5G आणि Poco M3 Pro 5G चा रिब्रँड व्हर्जन आहे, अशी चर्चा आहे. Xiaomi Central वेबसाईटने कंपनीच्या अंतर्गत सूत्रांच्या हवाल्याने आगामी Redmi Note 10T स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती दिली आहे.  (Redmi Note 10T 5G Price in India, Storage Variant Leaked)

Redmi Note 10T ची लीक किंमत 

Xiaomi चा आगामी Redmi Note 10T 5G स्मार्टफोन भारतात 14,999 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे Redmi Note 10T 5G चा एकमेव 4GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट रशियात 19,990 रुबल (अंदाजे 20,600 रुपये) की किंमतीत सादर केला गेला आहे. 

Redmi Note 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स    

Redmi Note 10T 5G मध्ये कंपनीने 6.5-इंचाचा Full HD+ IPS LCD डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 SoC देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Android 11 वर आधारित MIUI 12 देण्यात येईल. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.    

Redmi Note 10T 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये प्राइमरी कॅमेरा 48MP चा आहे. त्यासोबत 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.    

Web Title: Redmi note 10t 5g price in india leaked 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.