शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

फक्त साडे तीन हजारांत तुमचा होईल 50MP कॅमेरा असलेला Redmi फोन; अशी आहे Xiaomi ची बेस्ट ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 20:28 IST

Redmi 10 Prime स्मार्टफोन खास ऑफर अंतर्गत तुम्ही फक्त 3499 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.  

Redmi 10 Prime स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी, 6GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट आणि 50MP कॅमेरा असे भन्नाट स्पेसिफिकेशन्स आहेत. तरीही हा फोन खास ऑफरमुले फक्त 3,500 रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी मिळत आहे. यासाठी तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा फायदा घ्यावा लागेल. पुढे आम्ही याची सविस्तर माहिती दिली आहे.  

शाओमीच्या वेबसाईटवर Redmi 10 Prime स्मार्टफोनचा 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी असलेल्या मॉडेल 13,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. कंपनी Mi Exchange ऑफर अंतर्गत 10,500 रुपयांपर्यंतची सूट देत आहे. तुमच्या जुन्या फोनवर फुल एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास हा फोन फक्त 3,499 रुपयांमध्ये तुमचा होईल. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या कार्डनं पेमेंट करून तुम्ही 1 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता. 

Redmi 10 Prime चे स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi Redmi 10 Prime स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच होल कट-आऊटसह येणार हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी यात उजव्या पॅनलवर पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यात ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.0, GPS, IR blaster, Qj 3.5mm ऑडियो जॅक असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत. 

या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G88 SoC आहे. या रेडमी फोनमध्ये 6GB पर्यंतचा LPDDR4x RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 2GB एक्सपांडेबल रॅमला सपोर्ट करतो. हा बजेट स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टम आधारित MIUI 12.5 वर चालतो. Redmi 10 Prime चा आकार 161.95 X 75.57 X 9.56 मिमी आणि वजन 192 ग्राम आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमी