शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

Realme Narzo 30 सीरिज, Buds Air 2 धमाकेदार एन्ट्रीसाठी तयार, पाहा काय आहेत स्पेसिफिकेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 4:23 PM

Realme 5G Smartphones : २४ फेब्रुवारी रोजी ऑफिशिअल वेबसाईटवरून होणार लाँच

ठळक मुद्देदोन्ही स्मार्टफोन्समध्ये असेल दमदार स्पेसिफिकेशनBuds Air 2 देखील होणार लाँच

Realme नं आपल्या आगामी  Realme Narzo 30 सीरिजच्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. या सीरिजमधील स्मार्टफोन 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता लाँच होणार आहे. कंपनीनं आपली अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर यासंदर्भातील माहिती दिली आहे. या सीरिज अंतर्गत कंपनी सुरूवातीला Realme Narzo 30 Pro 5G आणि Realme Narzo 30A हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. याच आठवड्यात या दोन्ही स्मार्टफोनची लीक माहिती समोर आली होती. या लीकमध्ये या फोनचं डिझाईन आणि अन्य काही स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली होती. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यापूर्वी XDA Developers ला एक मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी Narzo 30 Pro 5G हा Mediatek Dimensity 800U 5G प्रोसेसरसह येणार असल्याचं म्हटलं होतं. 5000mAh बॅटरी आणि फास्ट चार्जिंग या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह पंच होल डिस्प्ले देण्यात येणार आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूला व्हर्टिकल डिझाईनच्या मॉड्युलमध्ये कॅमेरा लेन्स देण्यात येईल, याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरीही असू शकते. तसंच हा स्मार्टफोन 65 वॉट फास्ट चार्जिंगही सपोर्ट करेल. Realme Narzo 30A पॉवरफुल मिडरेंज फोनRealme Narzo 30A हा पॉवरफुल मिडरेंज स्मार्टफोन असेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये रिअर फिंगरप्रिन्ट सेन्सरसह स्वेअर शेप मॉड्युलमध्ये कॅमेरा सेटअप मिळेल. तसंच याचं रिअर पॅनल ब्लू आणि थोडं टेक्स्चर असलेलं असेल. दरम्यान, दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. परंतु नुकत्याच्या लाँच झालेल्या Realme X7 पेक्षा या स्मार्टफोनची किंमत कमी असेल असं म्हटलं जात आहे.  Buds Air 2 होणार लाँचया दोन्ही स्मार्टफोन्ससह २४ फेब्रुवारी रोजी Realme Buds Air 2 देखील लाँच केले जातील. हे नवे ट्रू वायरलेस इयरबड्स अॅक्टिव्ह नॉईस कॅन्सलेशन फीचरसह येतील. याव्यतिरिक्त यात ट्रान्सपरन्सी मोडसह अन्य नवे डिझाईनही देण्यात येऊ शकतात.

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनonlineऑनलाइनFlipkartफ्लिपकार्ट