65W फास्ट चार्जिंगसह येणार Realme Book लॅपटॉप; स्पेसिफिकेशन्स झाले लीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 17:42 IST2021-07-31T17:41:48+5:302021-07-31T17:42:42+5:30
RealmeBook launch: शाओमी आणि रियलमी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. परंतु यावेळी स्मार्टफोन्सच्या ऐवजी लॅपटॉप्स युद्ध बघायला मिळेल.

सौजन्य: GizNext आणि OnLeaks
या महिन्याच्या सुरवातीला बातमी आली होती कि स्मार्टफोन निर्माता चिनी कंपनी आपले लॅपटॉप भारतात लाँच करणार आहे. कंपनीचा पहिला लॅपटॉप Realme Book नावाने बाजारात दाखल होईल. आता हा लॅपटॉप चिनी सर्टिफिकेशन साईट 3C वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून समजले आहे कि, Realme Book लॅपटॉप 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
Realme Book च्या 3C लिस्टिंगमधून फक्त चार्जिंग पावरची माहिती मिळाली आहे. या लॅपटॉपमध्ये 65W Super VOOC चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी रियलमीच्या लॅपटॉपची भारतीय किंमत समोर आली होती. तसेच काही लिक्समधून या लॅपटॉपचे काही स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले होते.
Realme Book ची भारतीय किंमत
समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार हे हा रियलमी लॅपटॉप भारतात ऑगस्टपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. तसेच या लॅपटॉपची किंमत 40,000 रुपयांपासून सुरु होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. रियलमीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही, त्यामुळे ठोस माहितीसाठी रियलमी बुकच्या लाँचची वाट बघावी लागले.
Realme Books चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Realme Book मध्ये 14 इंचाचा फुल-एचडी एलईडी अँटी-ग्लेयर डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा लॅपटॉप स्लिम बेजल्ससह सादर केला जाऊ शकतो. लॅपटॉपचे वजन 1.5 किलोग्राम असेल. या रियलमी लॅपटॉपमध्ये 11th जनरेशन इंटेल कोर आय3 आणि कोर आय5 प्रोसेसर असू शकतात, सोबत अनेक रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध होऊ शकतात. रियलमी बुकमध्ये Windows 10 ऑपरेटिंग सिस्टम प्री-इंस्टॉल असू हुकते. पोर्ट्समध्ये यूएसबी टाइप-सी, यूएसबी टाइप-ए आणि मायक्रो-हेडफोन कॉम्बो जॅक देखील मिळू शकतो.