Realme Smartphone: रेडमीला मिळणार Realme कडून आव्हान; शानदार स्मार्टफोन लवकरच येणार भारतात 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 12:46 PM2022-01-13T12:46:14+5:302022-01-13T12:46:36+5:30

Realme Smartphone: Realme 9 स्मार्टफोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमूळे या फोनचा लाँच निश्चित झाला आहे.  

Realme 9 smartphone listed on bis will be launched in india soon  | Realme Smartphone: रेडमीला मिळणार Realme कडून आव्हान; शानदार स्मार्टफोन लवकरच येणार भारतात 

Realme Smartphone: रेडमीला मिळणार Realme कडून आव्हान; शानदार स्मार्टफोन लवकरच येणार भारतात 

googlenewsNext

Realme आपल्या बजेट सेगमेंटमधील पोर्टफोलिओ वाढवण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी Realme 9i स्मार्टफोन जागतिक बाजारात आला आहे. आता लवकरच Realme 9 सीरीज भारतात येणार असल्याचं दिसत आहे. कारण Realme 9 स्मार्टफोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमूळे या फोनचा लाँच निश्चित झाला आहे.  

हा स्मार्टफोन मॉडेल नंबर RMX3388 सह BIS वर लिस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन लवकरच भारतात येणार हे स्पष्ट झाले आहे. Realme 9 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी यूरेशियन इकोनॉमिक कमिशन (EEC) वर देखील लिस्ट करण्यात आला होता. परंतु या दोन्ही लिस्टिंगमधून या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली नाही. परंतु ही सीरिज मिड रेंज सेगमेंटमध्ये सादर केली जाईल आणि रेडमीला नक्कीच टक्कर देईल.  

Realme 9i चे स्पेसिफिकेशन्स  

रियलमी 9आय कंपनीनं 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह सादर केला आहे. हा पंच-होल असलेला आयपीएस एलसीडी पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा मोबाईल अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी युआय 2.0 वर चालतो. याला प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटची पॉवर देण्यात आली आहे. सोबत 6 जीबी रॅम +5 जीबी वर्चुअल वचुर्अल रॅम असा एकूण 11जीबी रॅम देण्यात आला आहे. यात 128 जीबी इंटरनल स्टोरेज देखील आहे.  

रियलमी 9आय मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. साईड माउंटेड फिंगरप्रिंटसह आलेला हा फोन 5000mAh च्या बॅटरीला सपोर्ट करतो, जी 33W फास्ट चार्जिंग स्पीडनं चार्ज करता येते.   

रियलमी 9आय स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह आला आहे. तिचे याची किंमत 6,490,000 VND इतकी ठेवण्यात आली आहे. ही किंमत 21,500 रुपयांच्या आसपास रूपांतरित होते. 

हे देखील वाचा:

PF मधील पैसे काढायचे आहेत का? UMANG App वर काही क्लिक्समध्ये होईल काम

OnePlus पुन्हा देऊ शकते स्वस्तात फ्लॅगशिप अनुभव; लाँचपूर्वीच OnePlus 9RT ची किंमत झाली लीक

Web Title: Realme 9 smartphone listed on bis will be launched in india soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.