स्किल इंडिया पुनर्सृजन: सॅप लर्निंग हबमुळे विद्यार्थी डिजिटल क्रांतीकडे मार्गक्रमित होण्यासाठी सक्षम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:36 IST2025-12-31T12:35:48+5:302025-12-31T12:36:44+5:30
भारतातील विद्यार्थ्यांसाठी सॅपने सॅप लर्निंग हब, स्टुडंट एडिशनच्या मोफत एक्सेसची घोषणा केली आहे.

स्किल इंडिया पुनर्सृजन: सॅप लर्निंग हबमुळे विद्यार्थी डिजिटल क्रांतीकडे मार्गक्रमित होण्यासाठी सक्षम
भारतातील विद्यार्थ्यांसाठी सॅपने सॅप लर्निंग हब, स्टुडंट एडिशनच्या मोफत एक्सेसची घोषणा केली आहे. जागतिक दर्जाच्या सॅप शैक्षणिक लायब्ररीसह सॅप लॉर्निंग हब विद्यार्थ्यांना मागणी असलेली कौशल्ये निवडण्याची, रोजगारासाठी सज्ज होण्याची तसेच जलद गतीने बदलत्या रोजगार बाजारपेठेमध्ये दटून राहण्याची मुभा देतो.
सॅप प्रमाणपत्र असलेल्या व्यावसायिकांना आता जास्त मागणी आहे. विद्यार्थी या ऑनलाइन तसेच भारतभर उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात.
टीन वँडेनब्रीडन, ग्लोबल व्हीपी सिक्स पार्टनर सोल्युशन एनॅबलमेंट, सॅप यांच्या मते, “डिजिटल कौशल्य भारताच्या भावी प्रगतीपर गाथेचा केंद्रबिंदू आहे. सर्वांना सॅप लर्निंग हब अॅक्सेस उपलब्ध केल्यामुळे भारतातील तरुणवर्गात डिजिटल क्रांतीचा प्रसार होईल, ज्यायोगे बहुराष्ट्रीय कार्पोरेशनना सक्रियपणे आवश्यक असलेली कौशल्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली जातील.”
या मंचावर तज्ज्ञ सत्रे घेतात, समुदायाला एक्सेस उपलब्ध करून दिलेला आहे आणि दोन वेळा मोफत परीक्षा देता येऊ शकतात. हा मंच स्ट्रीम-एग्नॉस्टिक आहे: वित्त, एचआर, पुरवठा साखळी, डेटा, विपणन आणि आयटी क्षेत्रांमधले विद्यार्थी या उपक्रमाचा संपूर्णपणे लाभ घेऊ शकतात. येत्या वर्षांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना सॅप कौशल्याने सज्ज होण्यासाठी सक्षम बनण्याची अपेक्षा सॅप ला आहे, ज्याचा मोबदला म्हणून टॅलेंट पूलमध्ये अधिकाधिक टेक - रेडी तरुण व्यावसायिकांची भर पडलेली पाहता येईल.
मोफत सॅप लॉर्निंग हब, स्टुडंट एडिशन बद्दल अधिक माहितीसाठी येथे भेट द्या: