Smartphone ला स्क्रिनगार्ड लावता?; मग हे वाचाच, नाहीतर बसू शकतो हजारोंचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 18:48 IST2021-08-25T18:45:52+5:302021-08-25T18:48:32+5:30
Smartphone Screenguard : बहुतांश लोक आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनसाठी त्यावर स्क्रिनगार्ड लावून घेत असतात. जसा चांगला फायदा आहे, तसा दुष्परिणाम काय आहे ते आपण पाहूया.

Smartphone ला स्क्रिनगार्ड लावता?; मग हे वाचाच, नाहीतर बसू शकतो हजारोंचा फटका
स्मार्टफोन आज सर्वांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आपण स्मार्टफोन विकत घेतो. त्याचा स्क्रिन कितीही स्क्रॅच प्रोडेक्टेड आहे असं आपल्याला सांगण्यात आलं तरी आपण त्याच्या स्क्रिनच्या सुरक्षेसाठी स्क्रिनगार्ड लावूनच घेत असतो. त्यामुळे स्क्रिनवर कोणतेही छोटे मोठे स्क्रॅचेस येत नाही. जरा त्याचा हा एक फायदा आपल्याला दिसतो तसा त्याचा धोकाही आपल्याला दिसून येतो. जर तुम्ही थर्ड पार्टी स्क्रिन प्रोटेक्टर वापरत असाल तर तुमच्या स्मार्टफोनसाठी ते हानीकारक ठरू शकतं आणि हजारोंचा फटकाही बसू शकतो.
एका रिपोर्टनुसार, मॉडर्न स्मार्टफोनमध्ये डिस्प्लेखाली दोन सेन्सर्स Ambient light सेन्सर आणि Proxymity सेन्सर आहेत. तुम्हाला हे दोन्ही सेन्सर्स दिसत नाहीत, जे फोनच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला रिसीव्हरजवळ असतात. अशाप्रकारे, जेव्हा आम्ही स्क्रिनच्या प्रोटेक्शनसाठी फोनवर स्क्रिन गार्ड लावता, तेव्हा तो सेन्सरला ब्लॉक करतो. यामुळे स्मार्टफोनची स्क्रीन नॉन रिअॅक्टिव्ह बनते. अशा स्थितीत तुम्हाला स्मार्टफोनवर कॉल येणं बंद होतं. तसेच, कधीकधी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर थर्ड पार्टी स्क्रीन गार्डच्या वापरामुळे व्यवस्थित काम करत नाही.
त्यामुळे जर तुम्हाला स्क्रिनगार्ड बसवायचं असेल तर ब्रँडेड स्क्रिनगार्ड वापरावा. ज्या कंपनीचा स्मार्टफोन आहे त्या कंपनीकडून चांगल्या ब्रँडचं स्क्रिन प्रोटेक्टर खरेदी करणं अधिक चांगलं होईल. स्मार्टफोन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्या स्मार्टफोनमध्ये सेन्सर कुठे आहे याची कल्पना असते. त्यामुळे त्या कंपन्या त्या प्रमाणेच स्क्रीनगार्ड तयार करत असतात.