कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 11:55 IST2025-09-25T11:55:03+5:302025-09-25T11:55:48+5:30
तुम्ही फक्त तुमचा अंगठा वापरून दुकानं, पेट्रोल पंप आणि शोरूममध्ये पेमेंट करू शकता.

फोटो - Proxgy
भारतातील अनेक लोकांना स्मार्टफोनने QR कोड स्कॅन करून UPI पेमेंट करताना पाहिलं आहे, परंतु ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही ते काय करू शकतात? अशा लोकांसाठी Proxgy स्टार्टअपने ThumbPay नावाचं प्रोडक्ट आणलं आहे, जे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनच्या मदतीने पेमेंट करण्याची खास सुविधा देतं. याचाच अर्थ तुम्ही फक्त तुमचा अंगठा वापरून दुकानं, पेट्रोल पंप आणि शोरूममध्ये पेमेंट करू शकता.
ही सिस्टम आधार ऑथेंटिकेशनला UPI शी कनेक्ट करते. फोन, कार्ड किंवा वॉलेट कनेक्ट करण्याची आवश्यकता नाही. पेमेंट करण्यासाठी ग्राहकांना फक्त डिव्हाइसवर त्यांचा अंगठा ठेवावा लागतो.
ThumbPay मध्ये पेमेंट प्रोसेस कशी आहे?
ThumbPay वापरून पेमेंट करण्यासाठी, ग्राहकांना त्यांचा अंगठा डिव्हाइसवर ठेवावा लागतो, जो नंतर स्कॅन केला जाईल. आधार इनेबल पेमेंट सिस्टम (AEPS) सिस्टम सर्वात आधी अंगठ्याच्या मदतीने व्यक्ती व्हेरिफाय करते. एकदा ऑथेंटिफिकेशन पूर्ण झालं की, UPI सिस्टम बँक-टू-बँक पेमेंट पूर्ण करेल. ग्राहकांना QR कोड, स्मार्टफोन किंवा रोख रकमेची आवश्यकता नाही.
सिक्योरिटी आणि हायजीनचा केला विचार
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डिव्हाइसमध्ये सर्टिफाइड फिंगरप्रिंट स्कॅनर लावला आहे, जो फ्रॉड डिटेक्शनसह येतो. यामध्ये व्हेरिफिकेशन्ससाठी एक लहान कॅमेरा देखील आहे. स्वच्छतेसाठी UV स्टेरेलायजेशन देखील दिलं आहे.
ThumbPay मध्ये QR कोड आणि NFC पेमेंट सपोर्ट
डिव्हाइसला अधिक चांगलं करण्यासाठी ते QR कोड आणि NFC पेमेंटला सपोर्ट करतं. ते UPI साउंडबॉक्स आणि 4G ला देखील सपोर्ट करतं. त्यात वायफाय कनेक्टिव्हिटी देखील आहे.
ThumbPay ची किंमत
ThumbPay ची किंमत २ हजार आहे. ते बॅटरी पॉवरवर ऑपरेट करू शकता, ज्यामुळे ते मोठ्या शोरूम, लहान दुकानं आणि अगदी ग्रामीण स्टोअरमध्ये वापरण्यासाठी योग्य ठरेल. ते थेट आधार-लिंक्ड बँक अकाऊंटशी कनेक्ट होतं. ज्यांचं बँक अकाऊंट त्यांच्या आधार कार्डशी लिंक केलेलं आहे ते डिव्हाइसवर त्यांचा अंगठा ठेवून पेमेंट करू शकतात.