सर्वांत स्वस्त! OnePlus Nord CE 5G चे प्री बुकिंग सुरु होणार; हजारोंच्या भेटवस्तू, असा मिळवा ऑफरचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 04:09 PM2021-05-31T16:09:04+5:302021-05-31T16:09:54+5:30

How to avail the offer: कंपनीने Nord CE 5G च्या लाँचिंगआधी प्री ऑर्डर आणि ओपन सेलच्या तारखांची घोषणा केली आहे. याचबरोबर हा फोन आगाऊ बुक करणाऱ्या ग्राहकांना 2,699 रुपयांची भेटवस्तू दिली जाणार आहे. 

Pre-booking of OnePlus Nord CE 5G begins at 11 june; Thousands of gifts, How to avail the offer | सर्वांत स्वस्त! OnePlus Nord CE 5G चे प्री बुकिंग सुरु होणार; हजारोंच्या भेटवस्तू, असा मिळवा ऑफरचा लाभ

सर्वांत स्वस्त! OnePlus Nord CE 5G चे प्री बुकिंग सुरु होणार; हजारोंच्या भेटवस्तू, असा मिळवा ऑफरचा लाभ

Next

चीनची प्रमियम स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus येत्या 10 जूनला भारत आणि युरोपमध्ये स्वस्तातील OnePlus Nord CE 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा फोन OnePlus Nord N10 5G चा उत्तराधिकारी म्हणून भूमिका निभावणार आहे. Nord N10 5G गेल्या वर्षी मोजक्या देशांमध्येच लाँच करण्यात आला होता. (Pre-book OnePlus Nord CE 5G and get free gifts worth Rs 2,699)


कंपनीने Nord CE 5G च्या लाँचिंगआधी प्री ऑर्डर आणि ओपन सेलच्या तारखांची घोषणा केली आहे. याचबरोबर हा फोन आगाऊ बुक करणाऱ्या ग्राहकांना 2,699 रुपयांची भेटवस्तू दिली जाणार आहे. 


 

OnePlus Nord CE 5G: प्री ऑर्डर डिटेल्स
कंपनीने अपकमिंग 4K स्मार्ट टीव्ही आणि OnePlus Nord CE 5G साठी एक डेडिकेटेड मायक्रो साईटद्वारे याची घोषणा केली आहे. मात्र, यासोबत कोणकोणते गिफ्ट दिले जाणार आहे, याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही. OnePlus Nord CE 5G Pre order 11 जूनपासून करता येणार आहे. तर भारतात या फोनचा ओपन सेल हा 16 जूनपासून सुरु होणार आहे. 

OnePlus Nord CE 5G मध्ये काय असेल...

  • OnePlus Nord CE 5G मध्ये बेसिक स्पेसिफिकेशन खालील प्रमाणे असणार आहेत. 
  • Nord CE 5G मध्ये 6.43-इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट.
  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G SoC असणार आहे. हा फोन में Xiaomi Mi 10i आणि Samsung Galaxy A52 5G यांना टक्कर देणार आहे. 
  • कॅमेरा- 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर कॅमेरा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात येईल. 
  • साईड माऊंटेड फिंगर प्रिंट स्कॅनर, फ्रंटला होल पंच कॅमेरा असेल. 
  • रंग- red-green-yellow mix आणि pink-blue-purple combo मध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे. 

Web Title: Pre-booking of OnePlus Nord CE 5G begins at 11 june; Thousands of gifts, How to avail the offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.