१० नाही ७ हजार रुपयांच्या बजेटमध्ये पोकोचा नवा C71 स्मार्टफोन लाँच; किंमत एवढी कमी की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 19:39 IST2025-04-04T19:39:24+5:302025-04-04T19:39:40+5:30
महागड्या फोनमध्ये जी फिचर्स असतात जसे की 120Hz रिफ्रेश रेट, ६ जीबीपर्यंत रॅम आणि डोळ्यांसाठी सुरक्षित असलेला टीयुव्ही सर्टिफाईड डिस्प्ले यात दिलेला आहे.

१० नाही ७ हजार रुपयांच्या बजेटमध्ये पोकोचा नवा C71 स्मार्टफोन लाँच; किंमत एवढी कमी की...
शाओमीची उपकंपनी पोकोने भारतात १०००० रुपयांच्या बजेटमध्ये फाईव्ह जी फोन लाँच केला आहे. कमी किमतीत ठिकठाक फिचर्स ज्यांना हवे असतात त्यांच्यासाठी हा फोन आहे. महागड्या फोनमध्ये जी फिचर्स असतात जसे की 120Hz रिफ्रेश रेट, ६ जीबीपर्यंत रॅम आणि डोळ्यांसाठी सुरक्षित असलेला टीयुव्ही सर्टिफाईड डिस्प्ले यात दिलेला आहे.
Poco C71 असे या फोनचे नाव असून यामध्ये एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. बॅक कॅमेरा सेटअप पाहून हा प्रिमिअम फोन वाटतो. ६.८८ इंचाची स्क्रीन आणि ६०० नीट्स ब्राईटनेस देण्यात आला आहे. तसेच स्क्रीनवर पाणी पडले तरीही वेट टच सपोर्ट यात देण्यात आला आहे. कमी बजेटचा फोन असल्याने यात Unisoc T7250 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये सध्या अँड्रॉईड १५ असून पुढील दोन अँड्रॉईड अपडेट यात देण्यात येणार आहेत.
जुन्या पंख्यालाच बनवा रिमोटवाला पंखा; हे छोटेसे एक डिव्हाईस बोर्डवर लावा, घरातील सर्व लाईटही...
15W चार्जिंग सपोर्ट असलेली 5,200mAh बॅटरी देण्यात आली आहे. मागील बाजूस 32MP कॅमेरा आणि समोर 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असून वायर हेडफोनसाठी जॅक आणि IP52 वॉटर रेझिस्टन्स देण्यात आला आहे.
Poco C71 ची 4GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट सुरुवातीची किंमत ₹ 6,499 रुपये असून ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,४९९ रुपये आहे. डेझर्ट गोल्ड, कूल ब्लू आणि पॉवर ब्लॅक अशा तीन रंगात हा फोन उपलब्ध होणार आहे.