पोकोने लाँच केला रिव्हर्स चार्जिंगवाला फोन; कमी किंमत, ६००० mAh बॅटरी आणि ५जी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 09:34 IST2025-12-19T09:34:00+5:302025-12-19T09:34:31+5:30
पोकोने आपला नवीन आणि स्टायलिश स्मार्टफोन पोको सी८५ ५जी नुकताच विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. १२,००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या श्रेणीत ...

पोकोने लाँच केला रिव्हर्स चार्जिंगवाला फोन; कमी किंमत, ६००० mAh बॅटरी आणि ५जी...
पोकोने आपला नवीन आणि स्टायलिश स्मार्टफोन पोको सी८५ ५जी नुकताच विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. १२,००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या श्रेणीत या फोनने बॅटरी, परफॉर्मन्स आणि डिझाइनच्या बाबतीत नवीन मापदंड प्रस्थापित केले आहेत. हा स्मार्टफोन सध्या फक्त फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
यामध्ये ६००० mAh ची मोठी बॅटरी आहे, जी दोन दिवसांहून अधिक काळ टिकते असा दावा कंपनीने केला आहे. ३३ वॅट फास्ट चार्जिंगमुळे हा फोन केवळ २८ मिनिटांत ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो. यात १० वॅट रिव्हर्स चार्जिंगची सोय आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचे इअरबड्स किंवा स्मार्टवॉच चार्ज करू शकता.
गेमिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी या सेगमेंटमधील सर्वात मोठा ६.९ इंचाचा डिस्प्ले आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० चिपसेट देण्यात आला आहे. तसेच हा फोन अँड्रॉइड १५ वर आधारित हायपरओएस २.२ सह येतो.
५० मेगापिक्सेलचा ड्युअल एआय कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मिस्टिक पर्पल, स्प्रिंग ग्रीन आणि पॉवर ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.