PNR status to GPS .... This android app is extremely dangerous; Beware! | पीएनआर स्टेटस ते जीपीएस....ही अ‍ॅप आहेत अतिधोकादायक; सावध व्हा!

पीएनआर स्टेटस ते जीपीएस....ही अ‍ॅप आहेत अतिधोकादायक; सावध व्हा!

अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे गुगलच्या प्लेस्टोअरवर मालवेअर असलेली अ‍ॅपचीही भरमार आहे. गुगल दरवेळी अशी हजारो अ‍ॅप काढून टाकत असते. तरीही अशी अनेक अ‍ॅप आहेत ज्यामध्ये मालवेअर असतो, तो तुमची माहिती चोरून दुसऱ्यांना पाठवितो. आज आपण सर्वाधिक वापरली जाणारी आणि धोकादायक अ‍ॅप  कोणती आहेत ते पाहणार आहोत. 


अ‍ॅपद्वारे पैसे कमविण्याचा मोठा गोरखधंदा सुरू झाला आहे. आपल्याला वाटते की पैसे कुठे द्यावे लागत आहेत. मात्र, तुमची माहिती चोरून ती अन्य कंपन्यांना विकली जाते. किंवा तुमचे पासवर्ड, एटीएम क्रमांक, पिन आदी चोरून त्याद्वारे तुम्हाला लुटले जाऊ शकते. यामुळे ही अ‍ॅप वापरताना सावध असलेले किंवा ही अ‍ॅप न वापरलेले चांगले आहे. डॉ. वेब नावाच्या सिक्युरिटी एक्सपर्टच्या संस्थेने काही अ‍ॅप संशयास्पद घोषित केली आहेत. 


या यादीमध्ये सर्वाधिक मालवेअरने दुषित असलेले अ‍ॅप आहे Ixigo Trains. हे अ‍ॅप तब्बल 50 दशलक्ष लोकांच्या मोबाईलमध्ये आहे. हे अ‍ॅप भारतातही चांगलेच लोकप्रिय आहे. यामध्ये अभ्यास, जीपीएस, नेव्हिगेशन आणि लोकेशन सारख्या सुविधा जोडलेल्या आहेत. अशा प्रकारची 33 अ‍ॅप डॉ वेबने शोधली आहेत, जी तुमची ही माहिती चोरून दुसऱ्यांना पाठवितात. Android.Click.312.origin नावाच्या व्हायरसने ही अ‍ॅप दुषित आहेत. 


तुमच्या मोबाईलमध्ये ही अ‍ॅप आहेत का...जरा एकदा तपासून पहाच
-- Ixigo Train

-- GPS Fix

-- Webcams

-- Bombuj

-- Social Studies (a Russian app)

-- 1300 Math Formulas Mega Pack

-- Sikh World - Nitnem & Live Gurbani Radio

-- OK Google Voice Commands (Guide)

-- Ramadan Times: Azan, Prayer Times & Qibla

-- Prayer Times: Azan, Quran, Qibla Compass

-- Al Quran Mp3 - 50 Reciters & Translation Audio

-- Full Quran MP3 - 50+ Audio Translation & Languages

-- Qibla Compass - Prayer Times, Quran, Kalma, Azan

-- Muslim Prayer Times & Qibla Compass

-- GPS Route Finder

-- Who deleted me?

-- Who unfriended me?

-- Notepad - Text Editor PRO

-- Notepad - Text Editor PRO (different APK)

-- Power VPN Free VPN for Android

-- Video to MP3 Converter, RINGTONE Maker, MP3 Cutter

-- Remove Unwanted Object

-- GPS Speedometer PRO

-- GPS Speedometer

-- PDF Viewer

-- Route Finder

-- Pedometer Step Counter

-- EMI Calculator - Loan & Finance Planner

-- English Urdu Dictionary

-- Cricket Mazza Live Line

-- ai.type keyboard Plus + Emoji

-- QR Code Reader

-- QR & Barcode Scanner

Web Title: PNR status to GPS .... This android app is extremely dangerous; Beware!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.