शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
6
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
7
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
8
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
9
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
10
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
11
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
12
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
13
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
14
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
15
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
16
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
17
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
18
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
19
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

चार्जिंगबद्दल डोन्ट वरी! फक्त 20 रुपयांत रेंटवर घ्या पॉवर बँक मग हवी तेवढी चालणार बॅटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 16:00 IST

Spykke News : स्मार्टफोन युजर्ससाठी एक खूशखबर आहे. त्यांना आता चार्जिंगचं टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण देशात पहिली स्मार्टफोन पॉवर बँक रेंटल सर्व्हिस 'स्पाईक' लाँच झाली आहे.

नवी दिल्ली - स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचा वापर हा केला जातो. मात्र अनेकदा सतत फोन सुरू असल्याने फोनची बॅटरी लवकर लो होते. नेमका कामाच्या वेळेस फोन चार्ज करता न आल्याने बंद होतो आणि विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच स्मार्टफोन युजर्ससाठी एक खूशखबर आहे. त्यांना आता चार्जिंगचं टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण देशात पहिली स्मार्टफोन पॉवर बँक रेंटल सर्व्हिस 'स्पाईक' (Spykke) लाँच झाली आहे.

8 हजार ठिकाणी कंपनीचं नेटवर्क 

संपूर्ण देशात 11 शहरांत 8 हजार ठिकाणी याचं नेटवर्क आहे. सध्या कंपनीचे आऊटलेट बंगळुरू, दिल्ली, मुंबई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, कोईंबतूर, चंडीगढ, लखनऊ, जयपूर आणि पुणे येथे आहे. एका आऊटलेटमधून पॉवर बँक रेंटवर घेऊन दुसऱ्या आऊंटलेटवर ती रिटर्न करता येऊ शकते.

कमीत कमी ताशी 20 रुपये 

स्पाईकचे 3 रेंटल प्लॅन आहेत. स्टँडर्ड प्लॅनमध्ये 20 रुपये ताशी पैसे द्यावे लागतील. एलिट प्लॅनमध्ये 1199 रुपये वर्षभरासाठी भरावे लागतील. तर सुप्रीम प्लॅनमध्ये 1999 रुपयांत लाईफटाईम मेंबरशिप मिळेल. या रेंटल सर्व्हिसचा वापर करणाऱ्यांसाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय आणि पेटीएमचा उपयोग पेमेंटसाठी करता येऊ शकतो.

जस्टडायलचे (Justdial Ltd) सह संस्थापक रमणी अय्यर (Ramani Iyer) यांनी आपलं नवं वेंचर 'स्पाईक' लाँच केलं आहे. अय्यर 'स्पाईक'ला जगभरातील सर्वात मोठी स्मार्टफोन पॉवर बँक रेंटल सर्विस कंपनी म्हणून स्थापित करू इच्छितात. काही महिन्यातच कंपनीचं भारतात सर्वात व्यापक स्मार्टफोन पॉवर बँक रेंटल नेटवर्क बनलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनIndiaभारत