paytm offer get worth up to rs 800 cashback on your first lpg gas cylinder booking | Gas Cylinder : अरे व्वा! फक्त 9 रुपयांत मिळणार 809 रुपयांचा गॅस सिलिंडर; जाणून घ्या, 'ही' जबरदस्त ऑफर

Gas Cylinder : अरे व्वा! फक्त 9 रुपयांत मिळणार 809 रुपयांचा गॅस सिलिंडर; जाणून घ्या, 'ही' जबरदस्त ऑफर

नवी दिल्ली - घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात  (Gas Cylinders Price) आता कपात करण्यात आली आहे. इंडियल ऑईल कॉर्पोरेशननं याबद्दलची माहिती दिली आहे. आजपासून सिलिंडरच्या दरात 10 रुपयांनी कपात झाली आहे. या कपातीनंतर राजधानी दिल्लीत अनुदानाशिवाय 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 809 रुपये आहे. मात्र आता ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. पेटीएम (Paytm) ने स्वस्त घरगुती गॅस खरेदी करण्यासाठी बंपर ऑफर आणली आहे. 

पेटीएमच्या ऑफरअंतर्गत तुम्हाला आता फक्त 9 रुपयांमध्ये 809 रुपयांचा गॅस सिलेंडर मिळू शकणार आहे. पेटीएमकडून गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी हा कॅशबॅक (Cashback) उपलब्ध आहे. त्याअंतर्गत तुम्हाला सिलिंडर बुक केल्यावर 800 रुपयांपर्यंतची कॅशबॅक मिळेल. पेटीएमची ही ऑफर 30 एप्रिल 2021 पर्यंत वैध आहे.

कशी मिळवायची ऑफर

- ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पेटीएम App घ्यावा लागेल. 

- App डाऊनलोड केल्यानंतर गॅस एजन्सीद्वारे आपल्याला सिलेंडर बुकिंग करावे लागेल. 

- सर्वप्रथम पेटीएम वर जा आणि Show more क्लिक करा यानंतर, ‘Recharge and Pay Bills’ वर क्लिक करा. 

- आपल्याकडे book a cylinder करण्याचा पर्याय असेल. इथे तुम्हाला गॅस प्रोव्हायडर निवडावा लागेल. 

- बुकिंग करण्यापूर्वी तुम्हाला FIRSTLPG चा प्रोमो कोड द्यावा लागेल जेणेकरून तुम्हाला कॅशबॅकची सुविधा मिळेल. 

- कॅशबॅक ऑफर 30 एप्रिल 2021 रोजी समाप्त होत आहे. बुकिंगच्या 24 तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे लागेल.

चार मेट्रो शहरांमध्ये एलपीजीची किंमत

एलपीजीच्या किंमती दहा रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. अनुदानाशिवाय 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत 809 रुपये, कोलकातामध्ये 835.50 रुपये, मुंबईत 809 रुपये आणि चेन्नईमध्ये 825 रुपये आहे.

LPG सिलिंडर खरेदीवर 30 लाखांचा विमा मोफत मिळणार, कठीण काळात मोठा फायदा होणार

एलपीजी सिलिंडर सध्या आपल्या वाढत्या किंमतींमुळे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांत सिलिंडरचे भाव वाढले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, या 14 किलो गॅस सिलिंडरबरोबरच तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा देखील मिळतात. या सिलिंडरबरोबरच प्रत्येक ग्राहकांच्या कुटूंबाला विमा देखील दिला जातो. प्रत्येक सिलिंडरवर विमा असतो. दुर्दैवाने जर सिलिंडरचा स्फोट झाला किंवा तोटा झाला तर तुम्ही विमा वापरू शकता. या विम्याच्या माध्यमातून तुम्ही नुकसानीची भरपाई करू शकता. एलपीजी सिलिंडर देणार्‍या कंपन्या कोणत्याही अनुचित घटनेविरूद्ध विमा प्रदान करतात.

LPG सिलिंडरसंदर्भात मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय; बदलला 'हा' नियम

येत्या दोन वर्षांत सरकार देशातील लोकांना 1 कोटी मोफत एलपीजी कनेक्शन देणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारीही केली जात आहे. देशातील प्रत्येक घरात एलपीजी कनेक्शन मिळावे यासाठी सरकार उज्ज्वलासारखी योजना चालवित आहे. त्याअंतर्गत येत्या दोन वर्षांत 1 कोटी मोफत एलपीजी कनेक्शनचे वितरण केले जाणार आहे, यासाठीचे नियम बदलण्याचीही सरकार तयारी करत आहे. तरुण कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार किमान कागदपत्रांत एलपीजी कनेक्शन देण्याची तयारी करत आहे. बदललेल्या नियमांमध्ये रहिवासी दाखला नसतानाही एलपीजी कनेक्शन देण्याची योजना आहे. 

Web Title: paytm offer get worth up to rs 800 cashback on your first lpg gas cylinder booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.