ऑनलाइन सेलचा धमाका; 99 रुपयांत रेडमी आणि 1 रुपयात बजेट फोन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 10:49 AM2019-10-03T10:49:03+5:302019-10-03T10:52:26+5:30

दररोज संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत 'क्रॅकर डील्स' असणार

Paytm Maha Cashback Carnival to Offer Redmi Phones at Rs. 99, Budget Phones at Re. 1 For a Limited Time | ऑनलाइन सेलचा धमाका; 99 रुपयांत रेडमी आणि 1 रुपयात बजेट फोन!

ऑनलाइन सेलचा धमाका; 99 रुपयांत रेडमी आणि 1 रुपयात बजेट फोन!

Next

नवी दिल्ली : दसरा आणि दिवाळी सणानिमित्त ई-कॉमर्स कंपन्यांनी ग्राहकांसाठी फेस्टिव्ह सीजन सेलच्या माध्यमातून शानदार ऑफर्स ऑनलाइन मार्केटमध्ये आणल्या आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांनी अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलचे आयोजन केले होते. या सेलमध्ये बेस्ट स्मार्टफोनसह अनेक वस्तूंवर मोठ्याप्रमाणात सवलत देण्यात आली होती. 

आता Paytm नेही 'महा कॅशबॅक कार्निव्हल' या नावाने सेल सुरु केला आहे. या सेलमध्ये कॅशबॅक आणि मोठी सवलत देण्यात येत आहे. 29 सप्टेंबरपासून सुरू झालेला हा सेल 6 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. तसेच, कंपनीने 'क्रॅकर डील्स'ची घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहक रेडमी फोन फक्त 99 रुपयांना आणि इतर बजेटमधील फोन केवळ 1 रुपयात खरेदी करू शकणार आहेत. 

'क्रॅकर डील्स' 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत असणार असून दररोज संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या ऑफरमध्ये फोनवर कॅशबॅकच्या माध्यमातून सूट मिळणार आहे. म्हणजेच, ग्राहकाला मूळ किंमतीतच फोन घ्यावा लागणार, त्यानंतर पेटीएम डिस्काउंटनंतर किंमत कॅशबॅकच्या माध्यमातून परत मिळेल. 

दरम्यान, 'क्रॅकर डील्स'मध्ये कोणते रेडमी फोन किंवा बजेट फोन उपलब्ध असणार आहेत, हे पेटीएमने जाहीर केले नाही. तसेच, कंपनी रोज संध्याकाळी सेल सुरू झाल्यानंतर याबाबतची माहिती देणार असल्याचे समजते. याचबरोबर, पेटीएमने सांगितले आहे की, जर कार्ट व्हॅल्यू (खरेदी करणाऱ्या वस्तूची किंमत) 5 हजार रुपयांपासून जात असेल तर या स्मार्टफोन्सवर बँक ऑफर सुद्धा मिळणार आहेत. यात एचडीएफसी बँकेचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इएमआय ट्रांजक्शनवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंड मिळत आहे. 
 

Web Title: Paytm Maha Cashback Carnival to Offer Redmi Phones at Rs. 99, Budget Phones at Re. 1 For a Limited Time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.