paytm cashback offer on lpg cylinder booking free lpg cylinder booking | लय भारी! Paytm ची जबरदस्त ऑफर, मोफत मिळवू शकता गॅस सिलिंडर; जाणून घ्या कसं?

लय भारी! Paytm ची जबरदस्त ऑफर, मोफत मिळवू शकता गॅस सिलिंडर; जाणून घ्या कसं?

नवी दिल्ली - घरगुती गॅस सिलिंडरसाठी (Gas Cylinders Price) सध्या ग्राहकांना जवळपास 692 रुपये मोजावे लागत आहेत. मात्र आता ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. आता गॅस सिलिंडर मोफतही मिळवता येऊ शकतो. या वर्षातील पहिला गॅस सिलिंडर पूर्णपणे मोफत मिळवण्याची संधी ग्राहकांना देण्यात आली आहे. पेटीएमने (PayTm) गॅस सिलिंडर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. Paytm च्या या ऑफरद्वारे एक महिन्याचे गॅस सिलिंडरचे पैसे आता वाचवता येणार आहेत. 

पेटीएमवर गॅस सिलेंडरचं बुकिंग (LPG Cylinder Booking on Paytm) केल्यानंतर 700 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक (LPG Cylinder Booking Cashback offer) मिळू शकतो. या जबरदस्त ऑफरचा फायदा घेण्यासाठी फक्त  PayTm App डाऊनलोड करून गॅस बुकिंग करावं लागेल. त्यानंतर 700 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जाईल. तसेच कॅशबॅकच्या सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी Recharge And Pay Bills या पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Book a Cylider वर क्लिक करा. येथे गॅस सिलिंडरसंबंधी माहिती भरावी लागेल. त्यानंतर बुकिंगआधी FIRSTLPG प्रोमो कोड टाकावा लागेल जेणेकरून तुम्हाला कॅशबॅकची सुविधा मिळू शकणार आहे.

पेटीएमची ही ऑफर फक्त जे ग्राहक पहिल्यांदा पेटीएमवरून गॅस बुकिंग करतील अशा ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे. सध्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 692 रुपये आहे. जर पेटीएमवरून गॅस बुक करूनसप्रोमो कोडचा वापर केल्यास, सिलेंडरची पूर्ण किंमत अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होईल. या ऑफरसाठी पेटीएमने अनेक गॅस सिलिंडर कंपन्यांशी देखील करार केल्याची माहिती मिळत आहे.

पेटीएमवरून गॅस सिलिंडर बुक करण्याचे "हे" आहेत फायदे

- पेटीएम गॅस सिलिंडर बुकिंगवर 700 रुपयांपर्यंत कॅशबॅक देत आहे. 

- ही ऑफर पहिल्यांदा गॅस बुक करणाऱ्यांना आहे. नव्या वर्षात पहिल्यांदा गॅस बुक करणाऱ्यांना कॅशबॅक मिळत आहे. 

- ही ऑफर कमीत कमी 500 रुपयांच्या बुकिंग अमाऊंटवर असून फक्त एकदाच त्याचा वापर करता येणार आहे.

- कॅशबॅकसाठी पेमेंट करताना, मिळणाऱ्या स्क्रॅच कूपनला ओपन करावं लागेल. 

- कॅशबॅकची ऑफर 31 जानेवारीपर्यंत लागू आहे. बुकिंग केल्यानंतर 24 तासांच्या आत कॅशबॅकचं स्क्रॅच कार्ड मिळेल. 

- हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावं लागेल. जर त्यावेळी स्क्रॅच कार्ड ओपन होत नसेल, तर Cashback and Offers Section मध्ये जाऊन ओपन करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मस्तच! आता Aadhar Card शिवाय देखील मिळेल LPG Cylinder वर सबसिडी, फक्त करावं लागणार "हे" काम 

दर महिना अथवा दी़ड महिन्याने गॅस सिलिंडर (Gas Cylinder booking) हा बुक केला जातो. घरगुती एलपीजी गॅसचे बुकिंग केल्यानंतर पाठवण्यात येणारी सबसिडी (LPG Cylinder Subsidy) सरकारकडून ग्राहकांच्या खात्यामध्ये थेट पाठवली जाते. सबसिडीचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गॅस कनेक्शनसोबत तुमचे आधार कार्ड लिंक असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा कोणत्याही कारणास्तवर आधार कार्ड आणि गॅस कनेक्शन लिंक नसेल तरी देखील आता सबसिडी मिळवू शकता. मात्र यासाठी काय करावे लागेल ते जाणून घेऊया. 

अशा प्रकारे घ्या सबसिडीचा फायदा 

- गॅस सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन एलपीजी डिस्ट्रिब्यूटरला बँक खाते क्रमांक द्यावा लागेल

-ज्यानंतर ग्राहकांच्या खात्यामध्ये सबसिडीची रक्कम थेट जमा होईल

- बँक खात्याच्या माहितीमध्ये तुम्हाला खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, बँकेच्या शाखेचा आयएफएससी (IFSC Code) कोड आणि 17 अंकी एलपीजी कंझ्यूमर आयडी द्यावा लागेल.

- ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्याच ग्राहकांना ही सुविधा देण्यात आली आहे.

Web Title: paytm cashback offer on lpg cylinder booking free lpg cylinder booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.