शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

पार्सल थेट घरात ! डिलिव्हरी बॉयकडे चावी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 08:11 IST

अमेझॉननं सर्वांत पहिल्यांदा २०१७ मध्ये दुकानदारांसाठी त्यांनी ही योजना आणली होती. त्यानंतर वॉलमार्टनंही ही योजना आणली होती. 

ऑनलाइन शॉपिंगचं प्रमाण तुमच्याकडे किती आहे? दर आठवड्याला, महिन्याला तुमच्याकडे किती डिलिव्हरीज‌् येतात? आणि असं किती वेळा घडतं की डिलिव्हरी बॉय येऊन गेला; पण आपण घरी नसल्यानं त्याला परत जावं लागलं? आपल्याकडे हा प्रकार कमी असला, तरी पाश्चात्य देशांत असं बऱ्याच वेळा घडतं. शिवाय पार्सल बिल्डिंगच्या आवारात किंवा दरवाजाजवळ ठेवलं तर चोरीस जाण्याची भीती! अमेझॉनचे असे अनेक पार्सल्स चाेरीला गेले आहेत आणि त्याचा बराच मोठा भुर्दंडही त्यांना बसला आहे. आपली कोणतीही डिलिव्हरी परत जाऊ नये आणि ठरलेल्या वेळी ग्राहकाला ती मिळावी यासाठी अमेझॉननं आता एक नवी युक्ती शोधली आहे. पार्सलमालक घरी नसताना त्याच्या घराच्या फ्रंटडोअरची ‘चावी’ डिलिव्हरी बॉयकडे असावी, यासाठी त्यांनी लोकांना विनंती करायला सुरुवात केली आहे. यासाठीचा सारा खर्च अमेझॉन स्वत: करते आहे. आपल्या स्पर्धकांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी ही तरतूद त्यांनी शोधून काढली आहे. अमेझॉननं सर्वांत पहिल्यांदा २०१७ मध्ये दुकानदारांसाठी त्यांनी ही योजना आणली होती. त्यानंतर वॉलमार्टनंही ही योजना आणली होती. सुरुवातीला या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, कारण सुरक्षेचा फार मोठा प्रश्न होता. २०१८ला घरगुती ग्राहकांसाठीही त्यांनी ही योजना सुरू केली. हॅकर्स ही तटबंदी फोडू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या आरोपांवर अमेझॉननं अजून उत्तर दिलेलं नाही. 

कशी चालते ही प्रणाली?१    ज्या दिवशी पार्सलची डिलिव्हरी दिली जाईल,त्याच्या चार तास आधी मालकाला मोबाइलवर नोटिफिकेशन येईल. २    डिलिव्हरी बॉय किंवा ड्रायव्हर तुमच्या घराजवळ पोहोचल्यावर पुन्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल.३    ही डिलिव्हरी ‘लाइव्ह’ पाहायचीही सोय आहे. ४    अमेझॉन स्कॅनरद्वारे डिलिव्हरी बॉय दरवाजा वाजवून तो उघडण्याची विनंती करेल.५    अमेझॉन तंत्रज्ञानाद्वारे खात्री करून घेईल, मग सुरक्षा कॅमेरे सुरू होतील आणि दरवाजाही उघडला जाईल.६    पार्सल दारातून आत सरकवलं की डिलिव्हरी बॉय ‘दरवाजा बंद करा’ अशी पुन्हा विनंती करील आणि दरवाजा आपोआप बंद होईल. ७    मोबाइलवर लगेच तुम्हाला मेसेज येईल, ‘डिलिव्हरी इज सेन्ट’!..

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉन