रहिवासी संकुलांच्या स्मार्ट सुरक्षेसाठी Panasonic नं लॉन्च केली IP व्हिडिओ इंटरकॉम सिस्टम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 18:10 IST2026-03-26T18:10:26+5:302026-03-26T18:10:50+5:30

रहिवासी आपल्या स्मार्टफोनद्वारे घरी आलेल्या व्यक्तीसोबत संवाद साधू शकतात आणि त्यांना प्रवेश द्यायचा की नाही हे ठरवू शकतात

Panasonic launches IP video intercom system for smart security of residential complexes | रहिवासी संकुलांच्या स्मार्ट सुरक्षेसाठी Panasonic नं लॉन्च केली IP व्हिडिओ इंटरकॉम सिस्टम

रहिवासी संकुलांच्या स्मार्ट सुरक्षेसाठी Panasonic नं लॉन्च केली IP व्हिडिओ इंटरकॉम सिस्टम

मुंबई - Panasonic लाइफ सोल्यूशन्स इंडियाने भारतात नवीन व्हिएल-व्हिक्यू सीरिज एसआयपी आधारित आयपी व्हिडिओ इंटरकॉम प्रणाली लॉन्च केली आहे. रहिवासी संकुले, मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पात सुरक्षा, संवाद आणि प्रवेश व्यवस्थापन अधिक सुगम करण्‍यासाठी या सिस्‍टमचा वापर होईल. भारतातील शहरी भागांत गेटेड कम्युनिटीज, बहुमजली इमारती आणि टाऊनशिप झपाट्याने विस्तार होत आहे. ज्‍यामुळे प्रगत आणि स्थिर सुरक्षा उपायांची गरज अत्यंत महत्त्वाची बनली आहे. ही वाढती गरज ओळखून पॅनासोनिकची ही नवीन यंत्रणा एकाच गॅझेटमध्ये थ्री-लेअर्ड सिक्युरिटी पुरवते. यामध्ये कंपनीच्या सेंटर मॅनेजमेंट सॉफ्टवेअरद्वारे (CMS) अनेक प्रवेशद्वार आणि संवाद केंद्रांचे मध्यवर्ती नियंत्रण केले जाते. ज्यामुळे निवासी सुरक्षा व्यवस्थापन अधिक स्मार्ट आणि कार्यक्षम होते. 

अपार्टमेंट्स, गेटेड कम्युनिटीज आणि मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी डिझाइन केलेली व्‍हीएल-व्‍हीक्‍यू सिरीज ही फक्त साधी व्हिडिओ डोअर फोन यंत्रणा नसून निवासस्थाने, इमारतींचे प्रवेशद्वार आणि मध्यवर्ती सुरक्षा केंद्र या तिन्ही स्तरांवर मजबूत सुरक्षा यंत्रणा उभी करते. ही यंत्रणा डोअर स्टेशन्स (Door Stations), लॉबी डिस्प्ले स्टेशन्स (Lobby Display Stations), रूम मॉनिटर्स (Room Monitors), गार्ड स्टेशन्स (Guard Stations) आणि सीएमएस यांना एकाच यंत्रणेवर केंद्रित करते. यामुळे रहिवासी आपल्या स्मार्टफोनद्वारे घरी आलेल्या व्यक्तीसोबत संवाद साधू शकतात आणि त्यांना प्रवेश द्यायचा की नाही हे ठरवू शकतात. तर दुसरीकडे, सुरक्षा पथक प्रवेशद्वारे, आयपी कॅमेरे आणि अनोळखी हालचालींवर रिअल-टाइममध्ये लक्ष ठेवू शकतात. फेस रेकग्निशन, QR कोड आणि रिमोट अनलॉकिंग अशा विविध पर्यायांसह ही यंत्रणा मोठ्या निवासी संकुलांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. 

सध्याच्या आधुनिक जगतात स्मार्ट सुरक्षा महत्त्वाची ठरत आहेत. जगभरातील निवासी संकुले आता सर्वोत्तम इंटेलिजेंट सिस्टम्सच्या शोधात आहेत. ज्या सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि सोयीसुविधांना एकत्र आणतील. आम्ही आयपी-आधारित सुरक्षा उपाय प्रगत करण्यासाठी कटिबद्ध आहोत, जे एकाच व्यासपीठावर संवाद, प्रवेश नियंत्रण आणि मध्यवर्ती व्यवस्थापन एकत्रित करतात. व्‍हीएल-व्‍हीक्‍यू सिरीजच्‍या सादरीकरणामधून विश्वासार्ह आणि अत्याधुनिक सुरक्षा उपाय उपलब्ध करून देण्यावर आमचा असलेला सातत्यपूर्ण भर दिसून येतो असं पॅनासोनिक एंटरटेनमेंट अँड कम्युनिकेशन कंपनी लिमिटेडचे चीफ बिझनेस प्लॅनिंग टोमो काझुया यांनी म्हटलं. 

काय आहे वैशिष्टे? 

सेंट्रलाइज सिस्टम, ज्यात डोअर स्टेशन्स, लॉबी डिस्प्ले स्टेशन्स, रूम मॉनिटर्स, गार्ड स्टेशन्स आणि सेंट्रल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर यांना जोडणारा हा एकच आयपी-आधारित प्‍लॅटफॉर्म आहे, ज्यामुळे विखुरलेल्या सुरक्षा यंत्रणांची गरज भासत नाही.

मल्टी-पॉइंट स्मार्ट एंट्री - यामध्ये फेस रेकग्निशन, आयसी कार्ड्स, क्यूआर कोड्स, स्मार्टफोन आणि डिजिटल अॅक्‍सेस अशा विविध प्रवेश पद्धतींचा समावेश आहे आणि या सर्वांचे मध्यवर्ती व्यवस्थापन केले जाते.

स्वतंत्र घरांपासून मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपर्यंत आणि एकात्मिक टाऊनशिप्सपर्यंत सर्वांना सुरक्षिततेची खात्री देण्यासाठी ही यंत्रणा डिझाइन केली आहे. ज्यात रिअल-टाइम सिक्‍युरिटी इंटेजिलन्‍स - मध्यवर्ती यंत्रणा व्यवस्थापनाद्वारे अभ्यागतांचे प्रत्‍यक्ष निरीक्षण, अलार्म नोटिफिकेशन्स आणि प्रवेशाची नोंद ठेवणे शक्य होते. शिवाय रिमोट अॅक्‍सेस आणि नियंत्रण - पॅनासोनिकच्या सीएमएस प्लॅटफॉर्मद्वारे स्मार्टफोनच्या माध्यमातून रहिवासी दुरूनही घरी येणाऱ्यांवर लक्ष ठेवू शकतात, त्यांच्याशी संवाद साधू शकतात आणि घराचे दार उघडू शकतात.

दरम्यान, मोठ्या निवासी प्रकल्पांसाठी डिझाइन केलेल्या संपूर्ण आयपी व्हिडिओ इंटरकॉम इकोसिस्टम व्यतिरिक्त पॅनासोनिक वैयक्तिक घरे आणि लहान निवासी प्रकल्पांसाठी खास तयार केलेले किट मॉडेल-व्‍हीएल-व्‍हीक्‍यूएस३०० (KIT Model-VL-VQS300) देखील उपलब्ध करून देत आहे. या किट मॉडेलमध्ये डोअर स्टेशन आणि रूम मॉनिटर एकत्रितपणे एकाच सोप्या व सुलभ व्हिडिओ डोअर फोन (व्‍हीडीपी) सोल्यूशनच्या स्वरूपात दिले जातात. मोठ्या प्रमाणावरील मल्‍टी-डिवाईस सिस्‍टमची आवश्‍यकता नसलेल्‍या घरमालकांसाठी हे मॉडेल डिझाइन करण्यात आले आहे. 

Web Title : स्मार्ट आवासीय सुरक्षा के लिए Panasonic ने लॉन्च किया IP वीडियो इंटरकॉम

Web Summary : Panasonic ने आवासीय सुरक्षा बढ़ाने के लिए VL-VQS सीरीज IP वीडियो इंटरकॉम सिस्टम लॉन्च किया। इसमें केंद्रीकृत प्रबंधन, फेस रिकग्निशन, क्यूआर कोड और रिमोट एक्सेस के माध्यम से मल्टी-पॉइंट एंट्री जैसी विशेषताएं हैं, जो गेटेड समुदायों और व्यक्तिगत घरों के लिए व्यापक सुरक्षा सुनिश्चित करती हैं।

Web Title : Panasonic Launches IP Video Intercom for Smart Residential Security

Web Summary : Panasonic launched VL-VQS series IP video intercom system for enhanced residential security. Features include centralized management, multi-point entry via face recognition, QR codes, and remote access, ensuring comprehensive security for gated communities and individual homes.