गर्मी होईल छूमंतर! स्वस्तात विकत घ्या AC असलेला जॅकेट, भर उन्हात देखील देईल गारवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 16:02 IST2022-05-31T16:01:32+5:302022-05-31T16:02:13+5:30
आता असं जॅकेट आलं आहे ज्यात AC आहे, जे काही मिनिटांत तुम्हाला थंड करू शकतं.

गर्मी होईल छूमंतर! स्वस्तात विकत घ्या AC असलेला जॅकेट, भर उन्हात देखील देईल गारवा
भारतात पावसाने हजेरी लावली असली तरी अजून गर्मी कमी झालेली नाही. गर्मीवर एसी हा सर्वात उपयुक्त उपाय असला तरी घराबाहेर एसीची हवा मिळत नाही. कोणत्या ना कोणत्या कामासाठी घराबाहेर पडावं लागतं आणि तेव्हा गर्मीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून बाजारात असं जॅकेट आलं आहे जे गर्मीत थंड हवा देतं. मेहनतीचं काम करणाऱ्या लोकांसाठी हे जॅकेट वरदान ठरू शकतं.
Outdoor Summer Cooling Fan Jacket
Outdoor Summer Cooling Fan Jacket मध्ये दोन फॅन आहेत. हे फॅन जॅकेटमधून काढून चार्ज करता येतात. तसेच फुल चार्ज झाल्यावर हे फॅन पुन्हा जॅकेटमध्ये फिट करता येतात. एकदा चार्ज केल्यावर तुम्ही 8 तास हवा खाऊ शकता. त्यासाठी कंपनीनं फॅनमध्ये 5,200mAh ची मोठी बॅटरी दिली आहे.
या जॅकेटचा वापर गर्मीमध्ये करता येतो तसेच तुम्ही थंडीतून देखील याचा वापर करू शकता. दोन्ही मौसमात तुम्ही या जॅकेटचा वापर करू शकता. फक्त थंडीच्या काळात तुम्हाला जॅकेटमध्ये फॅन फिट करावे लागणार नाहीत. वापरून खराब झाल्यास हे जॅकेट वॉशेबल असल्यामुळे फॅन काढून धुता येतं.
किंमत
Outdoor Summer Cooling Fan Jacket चीनमध्ये उपलब्ध आहे. तिथे या जॅकेटची किंमत 2,250 रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे. ई-कॉमर्स वेबसाईट Alibaba च्या माध्यमातून हे जॅकेट आयत देखील करता येईल. चीनमध्ये मजुरांमध्ये हे जॅकेट जास्त लोकप्रिय आहे.