सुपर ऑफर, फक्त 199 रुपयांत 'ही' कंपनी देतेय अनलिमिटेड इंटरनेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 04:12 PM2021-10-16T16:12:11+5:302021-10-16T16:13:05+5:30

Unlimited Data Plan : ऑर्टेल (Ortel) नावाच्या कंपनीने 199 रुपयांमध्ये अनलिमिटेड इंटरनेट देण्याची घोषणा केली आहे. 

Ortel Broadband Offers Unlimited Data Plan For Rs 199 | सुपर ऑफर, फक्त 199 रुपयांत 'ही' कंपनी देतेय अनलिमिटेड इंटरनेट!

सुपर ऑफर, फक्त 199 रुपयांत 'ही' कंपनी देतेय अनलिमिटेड इंटरनेट!

Next

नवी दिल्ली : सध्या देशात एअरटेल, बीएसएनएल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया सारख्या कंपन्या इंटरनेट सेवा पुरवत आहेत, पण याशिवाय इतरही अनेक कंपन्या आहेत, ज्या कमी खर्चात ब्रॉडबँड इंटरनेट (Broadband Internet) सेवा पुरवत आहेत. दरम्यान, सध्याचा काळ पाहता देशातील इंटरनेट स्वस्त होताना दिसून येत आहे. तुमच्यापैकी बरेच जण सध्या वर्क फ्रॉम होम करत असतील. (Ortel Broadband Offers Unlimited Data Plan For Rs 199)

वर्क फ्रॉम होम करण्यासाठी इंटरनेट खूप महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्यापैकी बरेच लोक हे स्वस्त इंटरनेटचा प्लॅन शोधत असतील. अशा लोकांसाठी एक खास प्लॅन आला आहे. आता 199 रुपयांमध्ये अनलिमिटेड इंटरनेटचा आनंद घेता येणार आहे. ऑर्टेल (Ortel) नावाच्या कंपनीने 199 रुपयांमध्ये अनलिमिटेड इंटरनेट देण्याची घोषणा केली आहे. 

Ortel ही एक प्रादेशिक ब्रॉडबँड कंपनी आहे, जी सध्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा येथे आपली सेवा देत आहे. Ortel कडे सध्या असे दोन ब्रॉडबँड प्लॅन आहेत, ज्यांची बरीच चर्चा होत आहे. यातील सर्वात खास म्हणजे 199 रुपयांचा प्लॅन आहे.

199 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये काय आहे?
Ortel च्या 199 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनला कंपनीने भुवनेश्वरमध्ये “Ortel Prime” असे नाव दिले आहे. या प्लॅनमध्ये दैनंदिन वापराची मर्यादा नाही, म्हणजेच तुम्ही दररोज हवा तेवढा डेटा वापरू शकता. या योजनेअंतर्गत ग्राहकांना 5Mbps ची डाऊनलोडिंग स्पीड मिळेल. या प्लॅनमध्ये अपलोड स्पीड फक्त 1Mbps आहे.

399 रुपयांच्या प्लॅनमधील फायदे
Ortelच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 10Mbps स्पीड मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही 449 रुपये खर्च केले तर तुम्हाला 30Mbps स्पीड मिळेल. जिओ फायबर देखील या किंमतीत समान स्पीड देते, मात्र जर तुम्हाला जास्त स्पीडची गरज नसेल तर 199 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

Web Title: Ortel Broadband Offers Unlimited Data Plan For Rs 199

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app