शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
2
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
3
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
4
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी;अनेकांची गेली दृष्टी,७ जणांची मृत्यूशी झुंज
5
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
6
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
7
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
8
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
9
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
10
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
11
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
12
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
13
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
14
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
15
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
16
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
17
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
18
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
19
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
20
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Daily Top 2Weekly Top 5

ओरॅकलमधील १२००० जणांच्या नोकऱ्या गेल्या, बेंगळुरूला मोठा हादरा बसला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 12:29 IST

Oracle Layoffs India 2026: Oracle मधील महाछंटणीमुळे बेंगळुरूच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये मंदीचे संकेत. आयटी प्रोफेशनल्स आता घर खरेदीपासून दूर का पळत आहेत? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण.

दिग्गज अमेरिकन आयटी कंपनी ओरॅकल मधील मोठ्या प्रमाणावरील छंटणीचे लोण आता बेंगळुरूच्या प्रॉपर्टी मार्केटपर्यंत पोहोचले आहे. आयटी कर्मचाऱ्यांच्या भरमसाठ पगारावर अवलंबून असलेल्या या मार्केटमध्ये आता मंदीचे सावट स्पष्टपणे दिसू लागणार आहे. ओरॅकलने भारतातून सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला असून, पुढील महिन्यात कपातीची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने रिअल इस्टेट क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.

२०२१ ते २०२३ या काळात बेंगळुरूच्या घरांच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. मात्र, आयटी क्षेत्रातील या अनिश्चिततेमुळे आता मागणीत घट झाली आहे. ज्या भागात आयटी प्रोफेशनल्सची मोठी वर्दळ असायची, तिथल्या नवीन प्रकल्पांची गती मंदावली आहे. 'टेक हब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात घरांच्या विक्रीवर थेट परिणाम झाला असून खरेदीदार आता मोठ्या गुंतवणुकीपासून मागे हटत आहेत. अशातच ओरॅकलचा दुसरा सर्वात मोठा कॅम्पस असलेल्या या शहरात कंपनीने एका झटक्यात १२ हजार लोकांना काढून टाकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

EMI च्या जाळ्यात अडकण्याची भीतीआयटी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या असुरक्षिततेमुळे अनेक कर्मचारी घर खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकत आहेत. सोशल मीडियावर एका नोकरी गेलेल्या तरुणाची पोस्ट सध्या चर्चेत आहे, त्याने लिहिले की, "बरं झालं मी घर खरेदी केलं नाही, नाहीतर आज EMI च्या जाळ्यात अडकून आयुष्य अधिक कठीण झालं असतं." हीच भावना सध्या बेंगळुरूमधील हजारो आयटी कर्मचाऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

पुणे, हैदराबादमध्येही चिंतेचे वातावरणकेवळ बेंगळुरूच नाही, तर पुणे, हैदराबाद आणि दिल्ली-एनसीआर सारख्या शहरांच्या रिअल इस्टेट मार्केटवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आयटी क्षेत्रातील पगारवाढ आणि नवीन भरतीवर या शहरांचे गृहनिर्माण क्षेत्र अवलंबून असते. ओरॅकलने जागतिक स्तरावर आतापर्यंत ३०,००० कर्मचारी कमी केले आहेत, ज्यामुळे तांत्रिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक असुरक्षितता वाढली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Oracle layoffs hit Bangalore hard, real estate market worries rise.

Web Summary : Oracle's 12,000 layoffs in India, primarily in Bangalore, are impacting the real estate market. Rising home prices are now threatened by decreased demand and uncertainty in the IT sector. Other IT hubs like Pune and Hyderabad also face potential real estate market consequences.
टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानLayoffsकर्मचारी कपातReal Estateबांधकाम उद्योग