100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोडसह Oppo Watch Free स्मार्टवॉच लाँच; ऑक्सिजनसह झोप सुद्धा करता येणार मॉनिटर
By सिद्धेश जाधव | Updated: October 4, 2021 14:56 IST2021-10-04T14:56:14+5:302021-10-04T14:56:52+5:30
New Oppo smartwatch Oppo Watch Free: Oppo Watch Free मध्ये ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर आणि ऑप्टिकल ब्लड ऑक्सीजन (SpO2) सेन्सरसह सादर करण्यात आला आहे.

100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोडसह Oppo Watch Free स्मार्टवॉच लाँच; ऑक्सिजनसह झोप सुद्धा करता येणार मॉनिटर
ओप्पोने आपला नवीन स्मार्टवॉच होम मार्केट चीनमध्ये Oppo Watch Free नावाने सादर केला आहे. यात क्रिकेट, बॅडमिंटन, स्कीइंगसह 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोडचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर यात ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर आणि ऑप्टिकल ब्लड ऑक्सीजन (SpO2) सेन्सर देण्यात आले आहेत. चीनमध्ये या स्मार्ट वॉचची किंमत 549 युआन (जवळपास 6,200 रुपये) ठेवण्यात आली आहे. लवकरच हा स्मार्ट वॉच भारतात देखील सादर केला जाऊ शकतो.
Oppo Watch Free चे स्पेसिफिकेशन्स
Oppo च्या या स्मार्ट वॉचमध्ये अॅमोलेड डिस्प्ले मिळतो. ज्याचा आकार 1.64 इंच आहे, जो 2.5D कर्व्ड ग्लाससह येतो. ओप्पो वॉच फ्री मधील 230mAh ची बॅटरी 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते. हा वॉच फक्त 75 मिनिटांत फुल चार्ज करता येईल. ब्लूटूथ BLE v5 चा वापर करून हा डिवाइस अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोन्सशी कनेक्ट करता येतो.
हा स्मार्टवॉच हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सीजन सॅच्युरेशन लेव्हल ट्रॅक करू शकतो. ओप्पो वॉच फ्रीमध्ये स्लीप मॉनिटरिंग, स्नोरिंग मॉनिटरिंग, डेली अॅक्टिव्हिटी इत्यादी हेल्थ फीचर्स देखील देण्यात आला आहेत. यात सिक्स-अॅक्सिस मोशन सेन्सर आणि अॅंबियंट लाईट सेन्सर आहे. हा वॉच 5ATM पर्यंत वॉटरप्रूफ आहे.तसेच यात 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड आहेत.