19GB RAM च्या ताकदीसह OPPO Reno 7 Pro 5G भारतात लाँच; मिळतेय DSLR सारखी कॅमेरा सिस्टम 

By सिद्धेश जाधव | Published: February 4, 2022 03:01 PM2022-02-04T15:01:04+5:302022-02-04T15:01:22+5:30

Reno 7 Pro Price India: OPPO Reno 7 Pro 5G भारतात 19GB RAM, 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा, 4450mAh बॅटरी आणि Mediatek Dimensity 1200 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे.

Oppo Reno 7 Pro 5G Phone Launched In India With 65W Supervooc Know Price Specs Sale Offer | 19GB RAM च्या ताकदीसह OPPO Reno 7 Pro 5G भारतात लाँच; मिळतेय DSLR सारखी कॅमेरा सिस्टम 

19GB RAM च्या ताकदीसह OPPO Reno 7 Pro 5G भारतात लाँच; मिळतेय DSLR सारखी कॅमेरा सिस्टम 

googlenewsNext

OPPO नं आज भारतात आपली रेनो 7 सीरीज सादर केली आहे. या सीरीजमध्ये OPPO Reno 7 5G आणि OPPO Reno 7 Pro 5G Phone लाँच करण्यात आले आहेत. यातील प्रो व्हर्जन 19GB RAM, 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा, 4450mAh बॅटरी आणि Mediatek Dimensity 1200 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया याची किंमत आणि स्पेक्स.  

OPPO Reno 7 Pro 5G चे स्पेसिफिकेशन    

6.55 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह Reno 7 Pro बाजारात आला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. ओप्पोनं फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली आहे. 

हा मोबाईल अँड्रॉइड 11 ओएस बेस्ड कलरओएस 12 वर चालतो. रेनो7 प्रो 5जी फोनला MediaTek Dimensity 1200 चिपसेटची पॉवर देण्यात आली आहे. सोबत एआरएम जी77 एमसी9 जीपीयू मिळतो. हा ओप्पो फोन 12GB पर्यंतच्या LPDDR4x RAM सह बाजारात आला आहे आणि त्याला 256GB पर्यंतच्या UFS 3.1 स्टोरेजची जोड देण्यात आली आहे.  वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं 7GB अतिरिक्त रॅम वाढवता येतो. म्हणजे एकूण 19GB RAM  मिळतो.  

या डिवाइसमध्ये 32 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स709 सेन्सर सेल्फी फ्रंट कॅमेऱ्याचं काम करतो. तर बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सोनी आयएमएक्स766 सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे.    

OPPO Reno 7 Pro 5G मधील बॅटरी देखील तेवढीच खास आहे. कंपनीनं यात ड्युअल बॅटरीचा वापर केला आहे, म्हणजे फोनमध्ये दोन बॅटरी सेल आहेत. ज्या प्रत्येकी 2,250एमएएचच्या क्षमतेसह येतात आणि मिळून 4,450एमएएचची पॉवर देतात. ही बॅटरी 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने चार्ज करता येते.    

OPPO Reno 7 Pro 5G ची किंमत 

ओप्पोच्या या प्रो मॉडेलचा एकच व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. यातील 7GB वर्चुअल रॅममुळे एकूण 19GB रॅम गरज पडल्यास मिळतो. भारतात याची किंमत 39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 8 फेब्रुवारीपासून Starlight Black आणि Startrails Blue कलरमध्ये विकत घेता येईल. 

हे देखील वाचा:

काही सेकंदात आउट-ऑफ-स्टॉक होणारा जबराट स्मार्टफोन येतोय; फ्लॅगशिप स्पेक्स मिळणार स्वस्तात, लाँचसाठी फक्त काही दिवस

अर्ध्या किंमतीत विकत घ्या 43-इंचाचा धमाकेदार Smart TV; शानदार 4K डिस्प्लेसह 50W चे स्पीकर

Web Title: Oppo Reno 7 Pro 5G Phone Launched In India With 65W Supervooc Know Price Specs Sale Offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.