शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

ओप्पो! खतरनाक कॅमेऱ्यांची Reno 10 सिरीज लाँच; एकाचा प्रोसेसर 8 जेन १

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 18:18 IST

ओप्पोने Oppo Reno 10 5G, Reno 10 Pro 5G आणि  Reno 10 Pro+ 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत.

भारतीय बाजारात व्हिवोच्या उपकंपन्यांनी गेल्या आठवडाभरात धडाधड वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. यामुळे कोणता घेऊ कोणता नको अशी परिस्थिती उद्भवली आहे. आजच ओप्पोने Reno 10 सिरीजमध्ये तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यामध्ये धासू कॅमेरे देण्यात आले आहेत. 

ओप्पोने Oppo Reno 10 5G, Reno 10 Pro 5G आणि  Reno 10 Pro+ 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. Reno 10 5G ची किंमत २० जुलैला जाहीर केली जाणार आहे. तर उर्वरित दोन फोनची किंमत जाहीर केली आहे. Reno 10 Pro 5G ची 39,999 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. तर Pro+ ची किंमत 54999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही फोन ग्लॉसी पर्पल आणि सिल्वर ग्रे कलरमध्ये उपलब्ध असणार आहेत. तर Reno 10 5G हा आइस ब्लू आणि सिल्वरी ग्रे कलरमध्ये असणार आहे. 

Oppo Reno 10 Pro+ 5G चे फिचर्सOppo Reno 10 Pro आणि प्रो प्लसमध्ये तीन मोठे बदल आहेत. Oppo Reno 10 Pro+ मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 SoC देण्यात आलेला आहे. तर पोट्रेट फोटोंसाठी 64 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलेला आहे. दोन्ही फोनमध्ये HDR 10+ सपोर्ट आणि 6.74 इंचाचा AMOLED 3D कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. 100W SuperVOOC आणि 4700 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

दोन्ही फोनमध्ये Sony IMX890 ५० मेगापिक्सल मेन सेन्सर देण्यात आला आहे. ३२ मेगापिक्सलचा सोनीचा सेल्फी सेंसर आहे. Oppo Reno 10 Pro 5G मध्ये सोनीच 32 मेगापिक्सल टेलीफोटो सेंसर देण्यात आला आहे. 8 मेगापिक्सलचा वाइड-एंगल कॅमेरा सेंसर आहे. तर यामध्ये 80W SuperVOOC आणि 4600mAh बॅटरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :oppoओप्पो