कमी किंमतीत लाँच होणार Oppo Pad टॅबलेट; स्पेसिफिकेशन आणि किंमतीचा झाला खुलासा

By सिद्धेश जाधव | Published: November 12, 2021 05:08 PM2021-11-12T17:08:35+5:302021-11-12T17:10:17+5:30

Oppo Pad Tablet Price And Details: आता विबोवरून आगामी Oppo Pad ची किंमत आणि काही स्पेक्स समोर आले आहेत. हा टॅब 120Hz रिफ्रेश रेट, 8080mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो.

Oppo pad tablet price and camera specifications leaked  | कमी किंमतीत लाँच होणार Oppo Pad टॅबलेट; स्पेसिफिकेशन आणि किंमतीचा झाला खुलासा

कमी किंमतीत लाँच होणार Oppo Pad टॅबलेट; स्पेसिफिकेशन आणि किंमतीचा झाला खुलासा

Next

ओप्पो आपल्या पहिल्या अँड्रॉइड टॅबवर काम करत आहे. हा टॅबलेट Oppo Pad नावाने बाजारात येईल. हा टॅब शाओमीच्या Mi Pad 5 सीरिजला थेट टक्कर देईल, असे याच्या स्पेसीफिकेशनवरून वाटते. आता किंमतीच्या बाबतीत देखील ओप्पो शाओमीची बरोबरी करेल असे दिसत आहे. टिपस्टर Digital Chat Station ने आगामी Oppo Pad टॅबलेटची किंमत आणि कॅमेऱ्याची माहिती दिली आहे.  

Oppo Pad ची किंमत 

टिपस्टरने दिलेल्या माहितीनुसार Oppo Pad टॅबलेट 120Hz रिफ्रेश रेट असलेल्या LCD डिस्प्लेसह सादर केला जाईल. तसेच यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल, अशी महती डिजिटल चॅट स्टेशनने विबोवरून दिली आहे. तसेच लीकनुसार Oppo Pad चीनमध्ये 2,000 युआन (सुमारे 23,300 रुपये) मध्ये सादर केला जाईल. ही किंमत शाओमीच्या मी पॅड 5 च्या बेस व्हेरिएंट इतकी आहे.  

Oppo Pad चे लीक स्पेसिफिकेशन्स  

चिनी टिपस्टर Digital Chat Station ने ओप्पो पॅडची माहिती दिली आहे. त्यानुसार हा टॅब 11 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह बाजारात येऊ शकतो. हा एक 2K+ (2560×1600 पिक्सल) रिजोल्यूशन असलेला एलसीडी डिस्प्ले असेल. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल, त्यामुळे डिस्प्ले स्मूद आणि शानदार अनुभव देईल.   

प्रोसेसिंगसाठी या टॅबलेटमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 870 चिपसेट दिला जाऊ शकतो. हा एक जुना परंतु फ्लॅगशिप लेव्हल चिपसेट आहे. पॉवर बॅकअपसाठी या डिवाइसमध्ये 8080mAh ची मोठी बॅटरी दिली देण्यात येईल. त्यामुळे बिंजे वॉचिंग, गेमिंग किंवा ऑनलाईन क्लासमध्ये लो बॅटरीचा अडथळा येणार नाही.   

Web Title: Oppo pad tablet price and camera specifications leaked 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.