Oppo चा पॉवरफुल स्मार्टफोन झाला आणखीन शक्तिशाली; दमदार कॅमेऱ्यासह नवीन व्हेरिएंट लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: September 17, 2021 07:38 PM2021-09-17T19:38:07+5:302021-09-17T19:38:19+5:30

ओपोने आपला नवीन स्मार्टफोन Oppo Find X3 Pro Photographer Edition चीनमध्ये सादर केला आहे, यासाठी कंपनीने कोडॅकशी भागेदारी केली आहे.

Oppo find x3 pro photographer edition launched  | Oppo चा पॉवरफुल स्मार्टफोन झाला आणखीन शक्तिशाली; दमदार कॅमेऱ्यासह नवीन व्हेरिएंट लाँच 

Oppo चा पॉवरफुल स्मार्टफोन झाला आणखीन शक्तिशाली; दमदार कॅमेऱ्यासह नवीन व्हेरिएंट लाँच 

Next

Oppo ने यावर्षी मार्चमध्ये आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Find X3 Pro सादर केला होता. आता या स्मार्टफोनचा एक नवीन व्हेरिएंट Oppo Find X3 Pro Photographer Edition कंपनीने सादर केला आहे. कंपनीने चीनमध्ये झालेल्या ColorOS 12 च्या इव्हेंटमधून हा फोन जगासमोर ठेवला आहे. या फोनच्या लूकच्या व्यतिरिक्त कंपनीने यात इतर कोणताही बदल केला नाही. या व्हेरिएंटसाठी कंपनीने कोडॅक सोबत भागेदारी केली आहे. चीनमध्ये हा स्मार्टफोन 6499 युआन (सुमारे 74,000 रुपये) आहे आणि 22 सप्टेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.  

Oppo Find X3 Pro Photographer Edition 

नवीन व्हेरिएंट Android 11 बेस्ड ColorOS 12 सॉफ्टवेयरवर चालतो. फोन मध्ये 6.7-इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट, 526ppi पिक्सल डेंसिटी, कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 आणि HDR 10+ सर्टिफिकेशनसह सादर करण्यात आला आहे. यात प्रोसेसिंगसाठी Snapdragon 888 SoC मिळते. त्याचबरोबर फोनमध्ये 12GB रॅम व 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. 

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य सोनी IMX766 कॅमेरा, 50-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स, 13-मेगापिक्सलची पेरिस्कोप लेन्स आणि 5-मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्स मिळेल. फोनमधील कॅमेरा फीचर्समध्ये 5x हायब्रिड झूम, 20x डिजिटल झूमचा समावेश करण्यात आला आहे. तसेच फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 65W फ्लॅश फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

Web Title: Oppo find x3 pro photographer edition launched 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.