शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

केवळ 64 रूपयांच्या रॉ-मटेरियलने बनतो एक iPhone?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 1:01 PM

आयफोनच्या किंमती ऐकून याच्या निर्मितीसाठी अफाट खर्च येत असेल असं प्रत्येकालाच वाटतं. पण आयफोनच्या निर्मितीसाठी येणा-या खर्चाबाबत एका वेबसाइटने दिलेली माहिती वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.

ठळक मुद्देआयफोनच्या किंमती ऐकून याच्या निर्मितीसाठी अफाट खर्च येत असेल असं प्रत्येकालाच वाटतं.पण आयफोनच्या निर्मितीसाठी येणा-या खर्चाबाबत एका वेबसाइटने दिलेली माहिती वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.या वेबसाइटनुसार आयफोनच्या निर्मितीमध्ये केवळ 64 रूपयांचं रॉ-मटेरियल वापरलं जातं.

मुंबई, दि. 13 - आयफोनच्या किंमती ऐकून याच्या निर्मितीसाठी अफाट खर्च येत असेल असं प्रत्येकालाच वाटतं. पण आयफोनच्या निर्मितीसाठी येणा-या खर्चाबाबत एका वेबसाइटने दिलेली माहिती वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. या वेबसाइटनुसार आयफोनच्या निर्मितीमध्ये केवळ 64 रूपयांचं रॉ-मटेरियल वापरलं जातं.Statista नावाच्या एका वेबसाइटने एका तक्त्याद्वारे आयफोनमध्ये केवळ 1.03 डॉलर  म्हणजे 64 रूपयांच्या रॉ मटेरियलचा वापर केला जातो असं म्हटलं आहे. वेबसाइटने केल्या दाव्यानुसार, रॉ मटेरियलमध्ये 38.5% अॅल्युमीनियम-आयरन, 31.1 ग्रॅम अॅल्युमीनियम, 19.9 ग्रॅम कार्बन, 18.6 ग्रॅम आयरन, 8.1 ग्रॅम सिलिकॉन, 7.8 ग्रॅम कॉपर, 6.6 ग्रॅम कोबाल्ट आणि 2.7 ग्रॅम निकेल आदि गोष्टींचा समावेश असतो. हे रॉ मटेरियल आयफोन 6 साठी वापरण्यात आलं होतं असं वेबसाइटने म्हटलं आहे. आयफोन बनवण्यासाठी अॅपल कंपनी रिसायकल केलेल्या प्रोडक्ट्सचा वापर केला जातो अशाही चर्चा अनेकदा रंगल्या आहेत.आयफोन-८ आणि आयफोन-८ प्लस लॉन्च, जाणून घ्या फिचर्स- अॅपलनं आपल्या बहुप्रतीक्षित आयफोनची नवी आवृत्ती आयफोन 8 व आयफोन 8 प्लस हे मोबाईल लाँच केले. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी याबद्दलची घोषणा केली. सिल्वर, स्पेस ग्रे आणि गोल्ड या तीन रंगात अॅपल मोबाइल मिळणार आहे. आयफोन 8ची किंमत 699 डॉलर (44760 रुपये) तर आयफोन 8 प्लसची किंमत 799 डॉलर (51163)पासून सुरु होईल. आयफोनमध्ये स्पेशल ऑडिओची सुविधा, ऑब्जेक्टकडे जाताच आवाज वाढतो आणि ऑब्जेक्टला मागे घेताच आवाज कमी होतो अशी सुविधा करण्यात आला आहे. अॅपलचे हे दोन्ही आयफोन  64 जीबी, 256 जीबीमध्ये उपलब्ध असणार आहेत. 15 सप्टेंबरपासून आयफोन बुकींग सुरु होणार आहे. तर 22 सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध असणार आहे. यामध्ये ३D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले आहे. आयफोन 8 मध्ये 4.7 इंचाचा डिस्प्ले तर आयफोन 8 प्लस मध्ये  5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे.  जानेवारी 2007 मध्ये पहिल्यांदाच अॅपलचे सहसंस्थापक आणि सीईओ टीव्ही जॉब्स यांनी आयफोन लाँच केला होता. अजूनही आयफोन हा जगातील महागडा फोन ओळखला जातो. आयफोनने 1000 डॉलरचा आकडाही ओलांडला आहे. 

लॉचिंगच्या कार्यक्रमापूर्वी स्टीव्ह जॉब्स थिएटरचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी स्टीव्ह जॉब्स यांच्या आठवणींना उजाळा दिला.  स्टीव्ह जॉब्सच्या आवाजील एका क्लिपने या सुरुवात झालेल्या सोहळ्यात व्यासपीठावर कंपनीचे टीम कुक अवतरले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. स्टिव्ह जॉब्जचे शब्द, त्याचा आवाज काळजाला भिडणारा असतो, असं सांगताना टीम कुक यांचे डोळे पाणावले. आता आपण ख-या अर्थाने स्टिव्हच्या स्वप्नांची पूर्तता करत आहोत. पुढे म्हणाले की,  आगामी काळात जगातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात आयफोन असेल. एक हजार व्यक्ती बसतील इतकी स्टीव्ह जॉब्स थिएटरची क्षमता आहे.या वर्षाअखेर पर्यंत अ‍ॅपलचे मुख्यालय नव्या इमारतीत स्थलांतरीत होणार आहे. 75 एकर जमीनीवर अ‍ॅपलचे स्टिव्ह जॉब्स स्पेसशिप आहे, यामध्ये 9 हजाराहून अधिक वृक्ष आहेत. कुपेरटिनो येथील अ‍ॅपलच्या नव्या कॅम्पसमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा सोहळा रंगला. अ‍ॅपलचा हा कॅम्पस पाहण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली. स्टीव्ह जॉब्स थिएटरमधील हा पहिलाच कार्यक्रम आहे. पहिल्यांदाच पत्रकारांसाठी स्टीव्ह जॉब थिएटरमध्ये प्रवेश देण्यात आला. 

iPhone 8, iPhone 8 + वैशिष्ट्ये -- आयफोन-8 आणि आयफोन-8 प्लस मध्ये 12 मेगाफ्किसल कॅमेरा  - 7000 सीरिज अॅल्युमिनियम, लेजर वेल्डेड स्टिल आणि कॉपर स्ट्रक्चर-  वायरलेस चार्जिगची सुविधा -  आयफोन 8 मध्ये 4.7 इंचाचा डिस्प्ले तर आयफोन 8 प्लस मध्ये  5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले  -‘होम बटण’ नसेल-‘फिंगर प्रिंट स्कॅनर’ असेल- ड्युअल कॅमेरा सेटअप- डायनॅमिक रेंजसाठी न्यू कलर फिल्टरची सुविधा- आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसची बॅटरी लाईफ वाढलेली असेल- ३D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले 

  

टॅग्स :Apple iPhone 8अ‍ॅपल आयफोन ८Apple iPhone 8 Plusअ‍ॅपल आयफोन ८ प्लसApple iPhone Xअ‍ॅपल आयफोन X