स्मार्टफोनवर आज असंख्य गेमिंग एप्स उपलब्ध आहेत, त्यापैकी काही तर लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. मात्र या ऑनलाईन गेमिंगचा मानसिक आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो याबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. गृह मंत्रालयाची नोडल एजन्सी 'I4C' अंतर्गत काम करणाऱ्या 'सायबर दोस्त'ने स्पष्ट केलं आहे की, ऑनलाईन गेमिंग आता केवळ मनोरंजनापुरते मर्यादित राहिलेलं नाही, तर अनेक प्रकरणांमध्ये ते मानसिक आरोग्यासाठी मोठा धोका बनलं आहे.
'सायबर दोस्त'ने एका पोस्टद्वारे 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ'च्या रिपोर्टचा हवाला दिला आहे. या रिपोर्टनुसार, ऑनलाईन गेम्समधील 'रिवॉर्ड सिस्टम' मेंदूच्या कार्यप्रणालीवर थेट परिणाम करते. अनेक घटनांमध्ये असं दिसून आलं आहे की, गेममध्ये हरल्यामुळे किंवा पालकांनी स्मार्टफोन काढून घेतल्यामुळे तरुणांनी स्वतःला इजा करून घेतली, इतकंच नाही तर काहींनी आपला जीवही गमावला.
ऑनलाईन गेम्सची रचना अशा प्रकारे केली जाते की, तरुणांना ते वारंवार खेळण्याची सवय लागते. यातील 'रिवॉर्ड सिस्टम' आणि 'सोशल कनेक्शन'मुळे मेंदूमध्ये 'डोपामिन'नावाचं केमिकल स्रवतं. यामुळे गेम खेळण्याची इच्छा अधिक तीव्र होते. जर कोणी गेम खेळण्यास मनाई केली किंवा बराच वेळ गेम खेळायला मिळाला नाही, तर मुले चिडचिडी आणि रागीट होतात.
ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाचे तोटे
तरुणांमध्ये मानसिक तणाव वाढतो .
दैनंदिन कामांमधील रस कमी होतो.
अभ्यासावर विपरीत परिणाम होतो आणि शैक्षणिक कामगिरी खालावते.
व्यसनाची लक्षणं
दररोज अनेक तास गेम खेळणं.
गेममध्ये हरल्यास किंवा खेळू न दिल्यास प्रचंड चिडचिड करणं.
अभ्यासातील प्रगती कमी होणं.
झोप कमी होणं.
घरच्यांशी खोटे बोलून गेम खेळणं.
ऑनलाईन गेमिंगचं व्यसन कसं सोडवावं?
वेळेवर मर्यादा आणा
गेम खेळण्याची वेळ हळूहळू कमी करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही ४ तास खेळत असाल, तर ते ३ तासांवर आणा आणि हळूहळू अर्धा-अर्धा तास कमी करत जा.
पर्यायी छंद जोपासा
रिकामा वेळ ऑनलाइन गेमऐवजी मैदानी खेळ, सायकलिंग, चालणं किंवा जिम यांसारख्या शारीरिक कामांमध्ये घालवा.
स्वतःला प्रश्न विचारा
गेम खेळणं योग्य आहे का? यामुळे माझ्या खऱ्या आयुष्यात मला काही साध्य होत आहे का? गेम खेळून माझा फायदा होत आहे की नुकसान? असे प्रश्न स्वतःला विचारल्यास यातून बाहेर पडण्यास मदत होईल.
Web Summary : Online gaming poses mental health risks, especially for youth. Addictive reward systems impact the brain, leading to anxiety, academic decline, and even self-harm. Experts advise limiting game time, pursuing hobbies, and self-reflection to overcome addiction.
Web Summary : ऑनलाइन गेमिंग मानसिक स्वास्थ्य के लिए खतरा है, खासकर युवाओं के लिए। नशे की लत इनाम प्रणाली मस्तिष्क को प्रभावित करती है, जिससे चिंता, शैक्षणिक गिरावट और यहां तक कि आत्म-नुकसान होता है। विशेषज्ञ लत से उबरने के लिए गेम का समय सीमित करने, शौक पूरा करने और आत्म-चिंतन करने की सलाह देते हैं।