शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

फेसबुक मॅसेंजर लाईटमध्ये व्हिडीओ चॅटिंगची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 1:07 PM

विकसनशील देशांमध्ये इंटरनेटच्या संथ वेगाची अडचण असते.

फेसबुक मॅसेंजरच्या लाईट आवृत्तीमध्ये व्हिडीओ चॅटिंगची सुविधा देण्यात आली असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.फेसबुक कंपनीने २०१५ साली आपल्या मॅसेंजरची लाईट आवृत्ती लाँच केली होती. विकसनशील देशांमध्ये इंटरनेटच्या संथ वेगाची अडचण असते. यातच या देशांमध्ये कमी रॅम आणि स्टोअरेजयुक्त अर्थात एंट्री लेव्हलचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात वापरले जातात. यामुळे युजर्सला आकारमानाने मोठे आणि जास्त इंटरनेटचा वापर करणारे अ‍ॅप्स वापरतांना अडचण होते. नेमकी हीच बाब लक्षात घेत फेसबुक मॅसेंजर लाईट हे स्वतंत्र अ‍ॅप सादर करण्यात आले होते. याचा आकार १० मेगाबाईटच्या आत असून ते तुलनेत कमी वेग असणार्‍या इंटरनेटवरही सहजपणे चालते. प्रारंभी भारत व इंडोनेशियासह ३० राष्ट्रांमध्ये फेसबुक मॅसेंजर लाईट अ‍ॅप लाँच करण्यात आले होते. आता याची व्याप्ती वाढवत जगातील तब्बल १०० देशांमध्ये याला लाँच करण्यात आले आहे. याच अ‍ॅपवर आता व्हिडीओ चॅटींग करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

फेसबुक मॅसेंजरच्या मुख्य अ‍ॅपमध्ये आधीच व्हिडीओ चॅटींगची सुविधा देण्यात आली असून ती युजर्सच्या पसंतीस उतरली आहे. या पार्श्‍वभूमीवर याच्या लाईट आवृत्तीचे युजर्सही व्हिडीओ चॅटिंगचा आनंद घेऊ शकणार आहेत. या अ‍ॅपवर आधीच टेक्स्ट, प्रतिमा, स्टीकर्स आणि लिंक शेअर करण्याची सुविधा दिलेली आहे. यात आता व्हिडीओची भर पडणार आहे. 

टॅग्स :FacebookफेसबुकMessengerमेसेंजर