12GB रॅम अन् 7100mAh ची बॅटरी; OnePlus च्या या फोनवर मोठा डिस्काउंट, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:20 IST2025-07-25T17:17:14+5:302025-07-25T17:20:16+5:30
OnePlus Nord CE 5: कंपनीने काही दिवसांपूर्वीच हा दमदार बॅटरीवाला फोन लॉन्च केला होता.

12GB रॅम अन् 7100mAh ची बॅटरी; OnePlus च्या या फोनवर मोठा डिस्काउंट, पाहा...
OnePlus ने त्यांच्या नुकत्याच लॉन्च झालेल्या Nord CE 5 ची किंमत कमी केली आहे. हा फोन महिन्याच्या सुरुवातीला OnePlus Nord 5 सोबत लॉन्च करण्यात आला होता. OnePlus कडून हा सर्वात मोठी बॅटरी असलेला फोन असून, यात तब्बल 7,100mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. या फोनची किंमत ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर कमी करण्यात आली आहे.
किंमत कमी झाली
कंपनीने OnePlus Nord CE 5 तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये 8GB RAM + 128GB, 8GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 256GB ला लॉन्च केला आहे. याची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये आहे. तर, इतर दोन व्हेरिएंट अनुक्रमे 26,999 आणि 28,999 रुपयांना मिळतात. पहिल्या सेलमध्ये, या फोनच्या खरेदीवर 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे.
याशिवाय, फोनच्या खरेदीवर नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरदेखील दिल्या जात आहेत. जुन्या फोनच्या बदल्यात हा फोन 23,450 रुपयांपर्यंत बचत करू शकता. हा फोन मार्बल मिस्ट, ब्लॅक इन्फिनिटी आणि नेक्सस ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.
Onlus Nord CE 5 चे फिचर्स
या OnePlus फोनमध्ये 6.77-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. फोनचा डिस्प्ले FHD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तर, याला 1430 nits पर्यंतच्या पीक ब्राइटनेससाठी देखील सपोर्ट मिळेल. हा फोन MediaTek Dimensity 8350 Apex प्रोसेसरवर काम करतो. हा फोन 12GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 7,100mAh बॅटरी आणि 80W SuperVOOC वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे.
OS आणि कॅमेरा
हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित OxygenOS 15 वर काम करतो. फोनमध्ये Google Gemini आधारित AI फीचर्स आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड, ब्लूटूथ 5.4, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखी फीचर्स आहेत. या फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनमध्ये 50 एमपीचा मुख्य आणि 8 एमपीचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16 एमपीचा कॅमेरा मिळेल.