बापरे..! पुन्हा एकदा OnePlus Nord 2 मध्ये स्फोट; दहा दिवसांच्या आत दुसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 15:23 IST2021-08-10T15:18:49+5:302021-08-10T15:23:17+5:30
OnePlus Nord 2 Blast: शुभम श्रीवास्तव नावाच्या ट्विटर युजरने ट्विट करून सांगितले कि त्याच्या वडिलांच्या Nord 2 स्मार्टफोनमध्ये अचानक स्फोट झाला आहे.

बापरे..! पुन्हा एकदा OnePlus Nord 2 मध्ये स्फोट; दहा दिवसांच्या आत दुसरी घटना
गेल्या महिन्यात OnePlus Nord 2 भारतात लाँच झाला आहे. हा मिड रेंज स्मार्टफोन कंपनीने ट्रू फ्लॅगशिप किलर म्हणून बाजारात सादर केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला OnePlus Nord 2 स्मार्टफोनमध्येस्फोट झाल्याची बातमी आली होती. तेव्हा कंपनीच्या तपासात स्फोट मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टमुळे झाला नसून बाह्य घटकांमुळे झाला असल्याचे निष्पन्न झाले होते. आता पुन्हा एकदा एका युजरने Nord 2 स्मार्टफोनमध्ये आग लागल्याचे म्हटले आहे.
शुभम श्रीवास्तव नावाच्या ट्विटर युजरने ट्विट करून सांगितले कि त्याच्या वडिलांच्या Nord 2 स्मार्टफोनमध्ये अचानक स्फोट झाला आहे. शुभमने स्फोट झालेल्या फोनचा कोणताही फोटो शेयर केला नाही. शुभमचे वडील सरकारी अधिकारी आहेत आणि ते सुरक्षित आहेत. या दुर्घटनेमुळे कोणतेही नुकसान झाले नसले तर आपल्या वडिलांना मानसिक धक्का बसल्याचे शुभमने म्हटले आहे. या ट्विटला रिप्लाय करून वनप्लसने तपास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि युजरला संपर्क साधण्यास सांगितले आहे.
नव्याकोऱ्या OnePlus Nord 2 मध्ये स्फोट
बंगळुरूमध्ये एका महिलेने तिच्या बॅगमध्ये OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन ठेवला होता. त्याचा स्फोट झाला आहे. या फोनचे फोटो काढून वनप्लसला टॅग करत तक्रार करण्यात आली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, महिलेने पाच दिवस आधीच OnePlus Nord 2 5G खरेदी केला होता. हा फोन पर्समध्ये ठेवून सायकलने ती बाजारात जात होती. तेव्हा अचानक स्फोट झाला. फोनला अचानक आग लागली आणि धूर निघू लागला.