वनप्लसचा धमाका! 20000 हून कमी किंमतीत स्मार्टफोन लाँच; दुसरा 5G तंत्रज्ञानाचा

By हेमंत बावकर | Published: October 26, 2020 07:45 PM2020-10-26T19:45:35+5:302020-10-26T19:45:54+5:30

OnePlus Nord N100 Launch : वनप्लसने आज अमेरिका आणि युरोपच्या बाजारात खळबळ उडविली आहे. स्वस्त किंमतीतील दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.

OnePlus blast! Smartphone launch for less than Rs 20,000; Another 5G technology | वनप्लसचा धमाका! 20000 हून कमी किंमतीत स्मार्टफोन लाँच; दुसरा 5G तंत्रज्ञानाचा

वनप्लसचा धमाका! 20000 हून कमी किंमतीत स्मार्टफोन लाँच; दुसरा 5G तंत्रज्ञानाचा

Next

प्रीमियम स्मार्टफोन बनविणारी चीनची कंपनी वनप्लस सर्वात स्वस्त OnePlus Nord N100 लाँच करून खळबळ उडवून दिली आहे. याचबरोबर कंपनीने स्वस्त किंमतीत oneplus Nord N10 5G लाँच केला आहे. वनप्लसच्या या नव्या फोनची किंमत 233 डॉलर म्हणजेच 17,230 रुपये आणि वनप्लस नॉर्ड एन10 5जी 429 डॉलर म्हणजेच 31,740 रुपये ठेवण्यात आली आहे. 


वनप्लस नॉर्ड एन100 हा एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. तर नॉर्ड एन10 5जी स्वस्त ५जी फोन आहे. याआधी कंपनीने दोन महिन्यांपूर्वी वनप्लस नॉर्ड भारतात लाँच केला होता. तो ५जी सपोर्ट करतो. याची किंमत 25 ते 29 हजाराच्या रेंजमध्ये आहे. सध्या हे दोन्ही फोन अमेरिकेच्या बाजारात लाँच झाले असून भारतातही लवकरच लाँच होणार आहेत. तसेच विक्रीही सुरु केली जाणार आहे. भारतीय बाजारपेठही या कंपनीसाठी महत्वाची असल्याने इथेही या किंमतींमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही. 

OnePlus 8T लाँच; Apple च्या नव्या आयफोनना देणार टक्कर, जाणून घ्या किंमत


OnePlus Nord N10 5G 
OnePlus Nord N10 5G मध्ये 6.49 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. Snapdragon 690 प्रोसेसर देण्यात आला असून हा ५ जी तंत्रज्ञनाने युक्त आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी दिली आहे. 30 Wफास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. 
या फोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असून 8MP, 2MP आणि 2MP डेप्थ सेंसरचे 4 कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. OxygenOS 10.5 ऑपरेटिंग सिस्टीम यामध्ये देण्यात आली आहे. 

 अखेर स्वस्तातला OnePlus Nord 5G लाँच; जाणून घ्या भारतातील किंमत


OnePlus Nord N100 
वनप्लसच्या या एन्ट्रीलेव्हल फोनमध्ये 6.52" HD+ स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये Snapdragon 460 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. 4GB RAM आणि 64GB व्हेरिअंट लाँच केले आहे. या फोनमध्ये 13MP+2MP+2MP ट्रिपल रियर कैमरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. 

Web Title: OnePlus blast! Smartphone launch for less than Rs 20,000; Another 5G technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.