OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:44 IST2025-12-04T12:43:55+5:302025-12-04T12:44:42+5:30
OnePlus Ace 6T Price and Specifications: वनप्लस एस ६टी मध्ये प्रचंड मोठी बॅटरी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना दीर्घकाळ फोन वापरता येणार आहे.

OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने त्याचा नवा स्मार्टफोन वनप्लस एस ६टी बाजारात लॉन्च करून प्रतिस्पर्धी कंपन्यांचे टेन्शन वाढवले आहे. या फोनची खासियत म्हणजे यात ८३०० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी दिर्घकाळ टिकेल. सध्या हा फोन चीनी बाजारात लॉन्च करण्यात आला असून लवकरच भारतात लॉन्च केला जाणार आहे. भारतात हा फोन वनप्लस १५ आर च्या नावाने लॉन्च केला जाईल.
बाजारात सध्या अनेक स्मार्टफोन ७५०० mAh क्षमतेच्या बॅटरीसह उपलब्ध आहेत. मात्र, या सर्वांमध्ये वनप्लस एस ६ टी हा स्मार्टफोन आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने ८३०० mAh क्षमतेची प्रचंड मोठी बॅटरी दिली आहे. या अतिरिक्त क्षमतेमुळे वापरकर्त्यांना आपला फोन वारंवार चार्जिंगला लावण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळाली आहे आणि त्यांना दीर्घकाळ फोन वापरता येणार आहे.
वनप्लस एस ६ टी: स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये ग्राहकांना ६.८३ इंचाचा डिस्प्ले मिळतो, जो 165Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच स्क्रीन प्रोटेक्शनसाठी ओप्पो क्रिस्टल शील्ड ग्लास देण्यात आला आहे. यात ५० मेगापिक्सेलचा मुख्य लेन्स आणि ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ग्राहकांना १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या फोनमध्ये ८३०० mAh क्षमतेची प्रचंड मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी १०० वॅट सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
वनप्लस एस ६ टी: किंमत
चीन बाजारात या फोनची (१२जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज) किंमत ₹२,५९९ युआन म्हणजेच ३३,१५० रुपयांपासून सुरू होते. तर, १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज असलेला फोन ३ हजार ८९९ युआनमध्ये (जवळपास ४८ हजार) लॉन्च करण्यात आला. हा स्मार्टफोन १७ डिसेंबर रोजी भारतात वनप्लस १५ आर या नावाने लॉन्च होईल.