शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

सॅमसंग-शाओमीला टक्कर देण्यासाठी OnePlus 9RT येतोय भारतात; OnePlus Buds Z2 देखील होऊ शकतात लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: October 20, 2021 1:06 PM

OnePlus 9RT India Price Launch Date Sale Offers: नवीन लिकनुसार लवकरच OnePlus 9RT आणि OnePlus Buds Z2 TWS earbuds भारतात सादर केले जातील.  

वनप्लस मोबाईल कंपनीचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 9RT जागतिक बाजारात लाँच झाला आहे. या फोनच्या लाँचनंतर भारतीय चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. आता बातमी आली आहे कि वनप्लस कंपनी आपला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लवकरच लाँच करेल. एका नवीन लिकनुसार लवकरच OnePlus 9RT आणि OnePlus Buds Z2 TWS earbuds भारतात सादर केले जातील.  

टिपस्टर मुकुल शर्माने वनप्लस 9आरटीच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. या लीकमध्ये कोणतीही अचूक तारीख सांगण्यात आली नाही, परंतु लवकरच कंपनी या फोनच्या लाँचची घोषणा करेल असेल सांगण्यात आले आहे. या फोनच्या लाँच इव्हेंटमधून कंपनी OnePlus Buds Z2 TWS earbuds देखील सादर करू शकते, असे सांगण्यात आले आहे.  

OnePlus 9RT चे स्पेसिफिकेशन्स   

OnePlus 9RT मध्ये 6.62-चाचा फुल एचडी+ E4 अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन, 1300 निट्स पीक ब्राईटनेस, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये कंपनीने क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरची पॉवर दिली आहे. त्याचबरोबर 12GB पर्यंतचा लेटेस्ट LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळते. विशेष म्हणजे हा फोन OxygenOS ऐवजी अँड्रॉइड 11 आधारित Oppo च्या ColorOS वर चालतो.    

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 16MP चा अल्ट्रावाईड अँगल सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा Sony IMX471 सेल्फी शुटर देण्यात आला आहे. OnePlus 9RT मधील 4,500mAh ची ड्युअल-सेल बॅटरी 65W Warp Charge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.    

OnePlus 9RT Price In India (भारतातील किंमत)   

वनप्लस 9आरटी च्या भारतीय किंमतीची माहिती टिपस्टर योगेश बरारने दिली आहे. त्यानुसार OnePlus 9RT भारतात 40 ते 44 हजार रुपयांच्या दरम्यान सादर केला जाऊ शकतो. टिपस्टरनुसार हा फोन OnePlus 8T च्या किंमतीत सादर केला जाईल. OnePlus 9RT चे किती व्हेरिएंट्स देशात एंट्री घेतील, याची माहिती मात्र अजूनही समजली नाही. चीनमध्ये या फोनचे तीन स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे तिथे या फोनची किंमत सुमारे 41,000 भारतीय रुपयांच्या आसपास सुरु होत आहे.   

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान