OnePlus 6 Vs 6T : सहा महिन्यांत असे काय बदलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 11:08 IST2018-10-31T10:59:58+5:302018-10-31T11:08:53+5:30
गेल्या मे महिन्यातच OnePlus 6 हा फोन लाँच करण्यात आला होता. जाणून घेऊयात या दोन्ही फोनमधील फरक.

OnePlus 6 Vs 6T : सहा महिन्यांत असे काय बदलले?
चीनची कंपनी OnePlus ने यंदाचा दुसरा फ्लॅगशिप फोन OnePlus 6T मंगळवारी भारतात लाँच केला. गेल्या मे महिन्यातच OnePlus 6 हा फोन लाँच करण्यात आला होता. जाणून घेऊयात या दोन्ही फोनमधील फरक.
OnePlus 6 आणि 6T मधील महत्वाचा बदल म्हणजे फिंगरप्रिंट सेन्सर. OnePlus 6 मध्ये पाठीमागे सेन्सर दिला आहे. तर 6T मध्ये डिस्प्लेवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. तसेच 6T मध्ये फेस अनलॉक फिचरही दिले आहे. याशिवाय या नव्या फोनमध्ये आणखी काही फिचर्स आहेत जे OnePlus 6 मध्ये नाहीत.
OnePlus 6 च्या तुलनेत 400 एमएएचनी जास्त बॅटरी 6T मध्ये देण्यात आली आहे. OnePlus 6 मध्ये 3300 एमएएच बॅटरी डॅश चार्जला सपोर्ट करत होती. तर 6T ची 3700 एमएएचची बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. 6T ची बॅटरी 6 पेक्षा 23 टक्के जास्त काळ चालत असून अर्ध्या तासाच्या चार्जिंगमध्ये ती दिवसभर चार्ज राहते.
OnePlus 6T मध्ये केवळ दोनच स्टोरेज व्हेरिअंट देण्यात आले आहेत. तर 6 मध्ये तीन स्टोरेज व्हेरिअंट होते. 6T मध्ये 128 जीबी आणि 256 जीबी व्हेरिअंट असून OnePlus 6 मध्ये 64 जीबी व्हेरिअंटही मिळत आहे.
डिस्प्लेच्या बाबतीतही मोठा बदल झाला आहे. साईज जवळपास 2 इंचांनी वाढविण्यात आली आहे. OnePlus 6T मध्ये 6.4 इंचाचा वॉटरड्रॉप नॉच आणि OnePlus 6 मध्ये 6.28 इंचाचा नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे.
कॅमेरा सारखाच असला तरीही काही फिचर्स वाढविण्यात आली आहेत. मात्र ही फिचर्स वनप्लसच्या 6 मध्येही अपडेट केली जाणार आहेत. दोन्ही फोनना सोनीचा सेन्सर आहे. अंधारात फ्लॅश शिवाय फोटो काढण्यासाठी नाईटस्केप हे फिचर आहे. तसेच स्टुडिओ हे फिचरही देण्यात आले आहे.
साम्य काय?
दोन्ही फोनमध्ये प्रोसेसर सारखाच देण्यात आला आहे. तसेच रॅमही 6 आणि 8 जीबी देण्यात आली आहे. दोन्ही फोनमध्ये कॅमेरा सारखेच आहेत. मागे 16 मेगापिक्सल प्रायमरी आणि 20 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. तर पुढे सेल्फी 16 मेगापिक्सल देण्यात आला आहे.
किंमत...
OnePlus 6 ची भारतातील किंमत 6/128 जीबी व्हेरिअंटची किंमत 37,999; 8/128 जीबीची किंमत 41,999; 8/128 जीबीची किंमत 45,999 रुपये आहे.