स्मार्टफोन बाजारात नेहमीच नवनवीन ट्रेंड आणणाऱ्या वनप्लस कंपनीने यंदा एक महत्त्वपूर्ण आणि आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. कंपनीने थेट OnePlus 14 हे नाव वगळून आपला पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन 'वनप्लस १५' नावाने बाजारात आणला आहे. या क्रमांक वगळण्यामागे चीनमधील एक कारण दडलेले आहे.
क्रमांक वगळण्याचे मुख्य कारण:
वनप्लस ही कंपनी मूळतः चिनी असल्याने, त्यांनी हा निर्णय चिनी संस्कृती आणि अंधश्रद्धा लक्षात घेऊन घेतला आहे. '४' (चार) अंकाचा संबंध: चिनी भाषेत 'चार' या अंकाचा उच्चार 'मृत्यू' या शब्दाच्या उच्चाराशी मिळताजुळता आहे. त्यामुळे, चिनी संस्कृतीत क्रमांक '४' हा अशुभ मानला जातो. यामुळे अनेक स्थानिक (चिनी) कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या नावांमध्ये ४ किंवा १४ या अंकाचा वापर करणे टाळतात, असे सांगितले जाते.
'OnePlus 3' लगेच '5' आलेला...वनप्लसने क्रमांक वगळण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही कंपनीने वनप्लस ३ नंतर थेट वनप्लस ५ लाँच केला होता. त्यावेळीही '४' हा अंक अशुभ मानला गेल्याने तो वगळण्यात आला होता.
इतर कंपन्याही याच मार्गावर:
वनप्लसची सिस्टर कंपनी असलेल्या ओप्पोने देखील त्यांच्या फोल्डेबल लाईनअपमध्ये फाइंड एन ३ नंतर थेट फाइंड एन ५ लाँच केला होता, त्यातूनही '४' हा अंक वगळण्यात आला होता. परंतू ओप्पोने रेनो सिरीजमध्ये १४ नंबरची सिरीज आणली होती. वनप्लसने मात्र १४ नंबरची सिरीज टाळली आहे.
Web Summary : OnePlus skips '14' for its new flagship, launching '15' due to Chinese superstition associating '4' with death. This isn't the first time, as they previously jumped from OnePlus 3 to 5. Sister company Oppo also avoids '4' in some product lines.
Web Summary : वनप्लस ने '14' को छोड़ा, नया फ्लैगशिप '15' लॉन्च किया, क्योंकि चीनी अंधविश्वास '4' को मृत्यु से जोड़ता है। ऐसा पहली बार नहीं है, पहले भी वनप्लस 3 से 5 पर गए थे। सिस्टर कंपनी ओप्पो भी कुछ प्रोडक्ट लाइनों में '4' से बचती है।