जबरदस्त फिचर्स अन् ढासू कॅमेरा असलेला OnePlus 12 अखेर भारतात लॉन्च, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 05:34 PM2024-01-24T17:34:09+5:302024-01-24T17:41:08+5:30

वनप्लस कंपनीने त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत. दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी या फोनबाबत माहिती दिली.

OnePlus 12 and OnePlus 12 R with amazing features and awesome camera finally launched in India, know more | जबरदस्त फिचर्स अन् ढासू कॅमेरा असलेला OnePlus 12 अखेर भारतात लॉन्च, जाणून घ्या

जबरदस्त फिचर्स अन् ढासू कॅमेरा असलेला OnePlus 12 अखेर भारतात लॉन्च, जाणून घ्या

नवी दिल्ली - वन प्लस कंपनीनं भारतात त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहे. मंगळवारी दिल्ली येथे झालेल्या ग्लोबल इव्हेंटमध्ये वनप्लस या मोबाईल कंपनीनं OnePlus 12 आणि OnePlus R हे दोन फोन भारतीय मार्केटमध्ये आणले. चीनमध्ये याआधीच हा फोन लॉन्च झाला आहे. वनप्लस 12 फोनची सुरुवातीची किंमत 64,999 रुपये तर वनप्लस 12 आर याची किंमत 39 हजार 999 इतकी ठेवण्यात आली आहे. 

OnePlus 12 R च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 39,999 रुपये आहे तर 16 जीबी आणि 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 45 हजार 999 रुपये आहे. तर दुसरीकडे OnePlus 12 या व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेजची किंमत 64 हजार 999 इतकी आहे. तर 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत 69 हजार 999 एवढी ठेवण्यात आली आहे. वनप्लस 12 आर या मॉडेलची येत्या 6 फेब्रुवारीपासून भारतात या फोनची विक्री होईल. तर वनप्लस 12 स्मार्टफोन 30 जानेवारीपासून विक्रीला येईल. परंतु वनप्लसच्या या दोन्ही स्मार्टफोनचे प्री बुकिंग 23 जानेवारी 2024 पासून सुरू झालं आहे. वनप्लस 12 या स्मार्टफोनसोबत कंपनीनं Google One चा 100 जीबी क्लाऊड स्पेसची ऑफर दिली आहे. जी 6 महिन्यापर्यंत मर्यादित राहील. त्यासाठी 3 महिन्यापर्यंत कंपनीकडून Free Youtube Premium सपोर्टही दिला आहे. 

या फोनचं वैशिष्टे काय?

One Plus 12 या फोनमध्ये 6.72 इंचाची LTPO AMOLED डिस्प्ले असून ज्यासोबत 2K रिजोल्युशन स्क्रिन मिळेल. त्यात 120 Hz रिफ्रेश रेट्स मिळेल. हा डिस्प्ले 4,500 Nits च्या पीक ब्राइटनेससह येईल. 

या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 ची चिपसेट कंपनीने दिली आहे. ज्यातून तुम्हाला सुपर फास्ट स्पीडचा अनुभव घेता येईल असा कंपनीचा दावा आहे. या फोनमध्ये AI चे अनेक फिचर्सही पाहायला मिळतील जो 16 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे OnePlus 12 या फोनमध्ये तुम्हाला Hasselblad Tuned Camera सिस्टिम देण्यात आली आहे. ज्यात 50 MP प्रायमरी कॅमेरा , 48 MP वाइड कॅमेरा, 64 MP टेलेफोटो कॅमेरासह 3X Optical Zoom आणि 48 MP Ultra Wide कॅमेरा दिला आहे. या फोनमधून DSLR सारखे फोटो तुम्ही मोबाईलमधून घेऊ शकता. तसेच 32MP सेल्फी कॅमेराही कंपनीने दिला आहे. 

OnePlus 12 मध्ये 5400 MH ची बॅटरी देण्यात आली असून ती 100 W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनसोबत कंपनीने रॅपिड वायरलेस चार्जर दिला असून तो 50W आहे. ज्यातून अवघ्या २४ मिनिटांत बॅटरी ० ते 100 टक्के चार्ज होऊ शकते. 

OnePlus 12 R मध्ये 6.78 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले मिळतो. ज्यात 1.5 K रिजोल्यूशन देण्यात आले आहे. त्याचसोबत कंपनीनं यात Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट दिली आहे. ज्यात 16 GB ची रॅम मिळेल. या फोनमध्ये 1 टीबीपर्यंत स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे. 
 
OnePlus 12 R मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. ज्यात 50 MP चा प्रायमेरी कॅमेरा असून 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेंस कॅमेरा आहे. तर यात 16 MP सेल्फी कॅमेराही आहे. 

कंपनीनं या इव्हेंटमध्ये OnePlus Buds 3 Earbuds ही भारतात लॉन्च केले आहेत. हा एक प्रिमियम TWS Earbuds आहे. ज्यात तीन पातळीवर नॉईस कॅंसिलेशन फिचर्स देण्यात आलेत. या Earbuds ला IP 55 रेटिंग देण्यात आली आहे. एकदा चार्जिंग झाल्यावर 6.5 तास नॉनस्टॉप तुम्ही म्युझिक ऐकू शकता. 

Web Title: OnePlus 12 and OnePlus 12 R with amazing features and awesome camera finally launched in India, know more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.