Google तुमची कोणती माहिती सेव्ह करतंय? अशाप्रकारे काही मिनिटांत जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 19:39 IST2022-02-02T19:38:35+5:302022-02-02T19:39:08+5:30
Google : गुगलजवळ तुमची किती माहिती स्टोअर आहे, ते तुम्ही सहजपणे तपासू शकता.

Google तुमची कोणती माहिती सेव्ह करतंय? अशाप्रकारे काही मिनिटांत जाणून घ्या...
नवी दिल्ली : सध्याच्या स्मार्टफोनच्या जगात गुगल (Google) हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपण फोनमध्ये जे काही करतो, त्यावर थेट गुगल लक्ष ठेवते आणि गुगल आपली सर्व माहिती आपल्या सर्व्हरवर स्टोअर करण्यास सुरवात करते, असे म्हटले जाते.
जरी गुगल युजर्सच्या कोणत्याही डेटाचा गैरवापर करू नका असे म्हणत असले तरी, जेव्हा तुमची पर्सनल अॅक्टिव्हिटी दुसर्यांपर्यंत असते. त्यामुळे ती चुकीच्या हातात जाईल आणि त्याचा गैरवापर होईल, याबाबत काही सांगता येत नाही.
यामुळे गुगलजवळ तुमची किती माहिती स्टोअर आहे, ते तुम्ही सहजपणे तपासू शकता. याबाबत जाणून घेण्यासाठी तुम्हाला गुगल अकाउंट सेक्शनमध्ये जावे लागेल. जर तुम्ही डेस्कटॉपवर असाल तर वरच्या उजव्या बाजूला तुम्हाला अकाउंटचा फोटो दिसेल. जर तुम्ही एखादी इमेज ठेवली असेल तर ती तुम्हाला दिसेल.
डेटा अँड प्रायव्हसी पाहा
गुगल अकाउंटच्या फोटोवर क्लिक करताच तुम्हाला मॅनेज युवर अकाउंटचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल, ज्यामध्ये डावीकडून तिसऱ्या क्रमांकावर डेटा अँड प्रायव्हसीचा ऑप्शन दिसेल. तुम्हाला यावर क्लिक करावे लागेल.
येथे पाहा तुमची हिस्ट्री
यानंतर संपूर्ण पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्ही कधी काय केले आहे आणि काय-काय सर्च केले, हे पाहता येईल. इथे तुम्हाला फक्त जीमेलच नाही तर गुगल मॅपची टाइमलाइन, यूट्यूब वॉच आणि सर्च हिस्ट्रीही पाहायला मिळेल.
बंद करू शकता तुमची अॅक्टिव्हिटी
याशिवाय, माय गुगल अॅक्टिव्हिटी (My Google Activity)अंतर्गत, तुम्ही गुगलवर कधी आणि काय शोधले हे देखील तुम्हाला कळू शकेल. तुमच्याकडे ते बंद करण्याचा ऑप्शन देखील आहे. तुम्ही काही सेटिंगद्वारे ते बंद करू शकता.