जबरदस्त! आता घर बसल्याच चंद्राची सफर करता येणार, गुगलने आणलं नवं फिचर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 15:47 IST2023-12-02T15:47:07+5:302023-12-02T15:47:42+5:30
इस्त्रोची चंद्रयान ३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर चंद्रावर कोणकोणत्या गोष्टी आहेत, चंद्र कसा आहे हे पाहण्याची अनेकांना इच्छा असते.

जबरदस्त! आता घर बसल्याच चंद्राची सफर करता येणार, गुगलने आणलं नवं फिचर
इस्त्रोची चंद्रयान ३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर चंद्रावर कोणकोणत्या गोष्टी आहेत, चंद्र कसा आहे हे पाहण्याची अनेकांना इच्छा असते. आता हे काम सोपं झालं असून गुगलने एक भन्नाट फिचर लाँच केलं आहे. या फिचरद्वारे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरुनच चंद्राची सफर करता येणार आहे. गुगलमध्ये फक्त एकच नाही तर अनेक अॅडव्हान्स फीचर्स आहेत, असेच एक फीचर म्हणजे गूगल मून आहे.
एमजी मोटर्स, व्हिवो या चिनी कंपन्यांनी फसवणूक केली? मोदी सरकारने दिले चौकशीचे आदेश
चंद्राच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करण्यात आला आहे. याला गुगल मून असे नाव देण्यात आले आहे, हे फीचर युजर्ससाठी २०१७ मध्ये लॉन्च करण्यात आले होते. हा नकाशा त्या लोकांसाठी खूप खास आहे ज्यांना अवकाशाच्या जगात रस आहे.
'या' स्टेप्स फॉलो करा
चंद्राला भेट देण्यासाठी, तुम्हाला अगोदर Google वर सर्च वर जावे लागेल आणि Google Moon टाइप करावे लागेल, तुम्ही या कीवर्डसह शोध करताच, तुम्हाला Google Moon नावाची पहिली अधिकृत लिंक मिळेल.
या लिंकवर क्लिक करताच तुम्हाला चंद्राचा पृष्ठभाग दिसू लागेल. तुम्ही झूम करून चंद्राचा पृष्ठभागही पाहू शकता आणि गुगल मून पेजवर दिलेले झूम इन फिचर तुम्हाला या कामात मदत करेल.
केवळ गुगल मूनच नाही तर गुगलकडे इतरही अनेक फिचर आहेत जी तुम्हाला खूप मनोरंजक वाटतील.