आता यूट्यूबवर व्हिडीओ पाहा वेगात, विनाअडथळा; लाँच केले सुमारे ३६ नवे फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 06:00 AM2023-10-20T06:00:07+5:302023-10-20T06:00:15+5:30

व्हिडीओ फॉरवर्ड करण्यासह डार्क थीम, ऑडिओ कंट्रोल, स्क्रीन लॉकसह जवळपास ३६ नवे फीचर्स यूट्यूबने जारी केले आहेत.

Now watch videos on YouTube at high speed, without interruption; Around 36 new features launched | आता यूट्यूबवर व्हिडीओ पाहा वेगात, विनाअडथळा; लाँच केले सुमारे ३६ नवे फीचर्स

आता यूट्यूबवर व्हिडीओ पाहा वेगात, विनाअडथळा; लाँच केले सुमारे ३६ नवे फीचर्स

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगातील प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आणि सर्वांत मोठ्या व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूबचा यूजर्सना अधिक चांगल्या प्रकारे अनुभव घेता येणार आहे. व्हिडीओ पाहताना पटापट व्हिडीओ फॉरवर्ड करण्यासह डार्क थीम, ऑडिओ कंट्रोल, स्क्रीन लॉकसह जवळपास ३६ नवे फीचर्स यूट्यूबने जारी केले आहेत. तसेच तुम्ही यापूर्वी पाहिलेल्या व्हिडीओंची माहिती वा नव्याने एखादा व्हिडीओ शोधायचा असल्यास ‘यू’ टॅब लाँच केले आहे.

२० सेकंदांपर्यंत फास्ट फॉरवर्ड
आतापर्यंत यूट्यूबवर १० सेकंदांपर्यंत व्हिडीओ फास्ट फॉरवर्ड करता येत होते. अपडेटनुसार आता तो २० सेकंदांपर्यंत करता येणार आहे. तसेच यूट्यूबने मोबाइलवर स्क्रीन लॉक मोड हे फीचर आणले आहे. त्यामुळे व्हिडीओ पाहताना चुकून टच झाल्यास काही अडचण येणार नाही.

‘यू’ सर्च बटन
यूट्यूबवर व्हिडीओ शोधायचा असेल किंवा पूर्वी पाहिलेला व्हिडीओ पुन्हा शोधण्यासाठी ‘यू’ टॅब देण्यात आली आहे. त्यासाठी लायब्ररी व अकाउंट टॅब एकत्र केला आहे.

इतर फीचर्स कोणती? 
nअधिक मोठे 
प्रीव्ह्यू थंबनेल्स 
nस्मार्ट टीव्हीसाठी नवा व्हर्टिकल मेन्यू 
nअद्ययावत सबस्क्राइब बटन
nडिस्क्रिप्शनमधून व्हिडीओ लिंक कॉपीची सुविधा
nॲम्बियंट मोड, लाइट मोड, डार्क मोड 
nऑडिओ कंट्रोल
nएआय क्रिएटर टूल.

Web Title: Now watch videos on YouTube at high speed, without interruption; Around 36 new features launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.