लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशाची मोबाइल फोन निर्यात सप्टेंबरमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ९५ टक्क्यांनी वाढून १.८ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे. ही माहिती इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स एसोसिएशन (आईसीईए) ने दिली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने पारंपरिकरीत्या निर्यातसाठी मंद महिने असतात, परंतु यावेळी या महिन्यातील मजबूत वाढ भारतातील उत्पादन वाढ दर्शविते. एप्रिल-सप्टेंबर दरम्यान मोबाइल फोन निर्यात १३.५ अब्ज डॉलर्स इतकी होती, जी गेल्या वर्षी याच कालावधीत ८.५ अब्ज डॉलर्स होती.
फोन निर्यात कुणाला? : अमेरिका, संयुक्त अरब अमिरात (यूएई), ऑस्ट्रिया, नेदरलँड्स आणि ब्रिटन.
पहिल्या सहामाहीत अमेरिकेला अंदाजे ९.४ अब्ज डॉलरचे निर्यात झाले. या वाढीचे प्रमाण सुमारे २०० टक्के आहे. यावेळी निर्यातीत अमेरिकेचा वाटा ७० टक्के आहे, जो गेल्या वर्षी ३७ टक्के होता, असे समोर आले आहे.
भारताचा मोबाइल फोन उद्योग मोठी प्रगती करत आहे. वाढीच्या पुढील टप्प्यात हा स्तर आणि स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्याची आपली क्षमता ही पातळी आणि स्पर्धात्मकता राखण्यावर अवलंबून असेल.- पंकज मोहिंद्रू, अध्यक्ष, आईसीईए
Web Summary : India's mobile phone exports jumped 95% to over $1.8 billion in September. April-September exports reached $13.5 billion. The US is a major importer, accounting for 70% of exports, a 200% increase.
Web Summary : सितंबर में भारत का मोबाइल फोन निर्यात 95% बढ़कर 1.8 अरब डॉलर से अधिक हो गया। अप्रैल-सितंबर के दौरान निर्यात 13.5 अरब डॉलर रहा। अमेरिका प्रमुख आयातक है, जिसका निर्यात में 70% हिस्सा है, जो 200% की वृद्धि दर्शाता है।