ऐका हो ऐका... नोकिया देतेय 3000 रुपयाचे इअरफोन फ्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 10:53 IST2018-11-05T10:42:00+5:302018-11-05T10:53:16+5:30

सणाच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या काही खास ऑफर्स देत आहेत. यंदाची दिवाळी विशेष करण्यासाठी HMD Global ने ही आपल्या ग्राहकांना एक खास ऑफर दिली आहे.

nokia giving free bluetooth wireless earphone purchase of nokia 3.1 nokia 5.1 and nokia 6.1 | ऐका हो ऐका... नोकिया देतेय 3000 रुपयाचे इअरफोन फ्री!

ऐका हो ऐका... नोकिया देतेय 3000 रुपयाचे इअरफोन फ्री!

नवी दिल्ली - सणाच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या काही खास ऑफर्स देत आहेत. यंदाची दिवाळी विशेष करण्यासाठी HMD Global ने ही आपल्या ग्राहकांना एक खास ऑफर दिली आहे. या ऑफरमध्ये नोकियाचे काही खास स्मार्टफोन्स कंपनीच्या अधिकृत ऑनलाईन स्टोर्सवरून खरेदी केल्यास 3,360 रुपयांचे वायरलेस  इयरफोन मोफत देण्यात येणार आहेत. नोकिया 3.1 प्लस, नोकिया 5.1 प्लस आणि नोकिया 6.1 प्लस या स्मार्टफोनवर हे इयरफोन मोफत मिळणार आहे. 

नोकियाच्या 'या' स्मार्टफोनवर 3,360 रुपयाचे इअरफोन फ्री!

- Nokia 6.1 Plus

नोकिया 6.1 प्लस या स्मार्टफोनची किंमत 15, 999 रुपये आहे. मात्र तुम्हाला जर यावर मोफत मिळणारे इयरफोन नको असल्यास फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 14,999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच फ्लिपकार्टवर नो कॉस्ट EMI चा पर्याय दिला असून जूना स्मार्टफोन दिल्यास अधिक सूट मिळणार आहे. 

- Nokia 3.1 Plus

नोकिया 3.1 प्लस हा स्मार्टफोन केवळ कंपनीच्या वेबसाईटवर 11, 499 रुपयांना उपलब्ध आहे. गेल्या महिन्यात हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. 

- Nokia 5.1 Plus

नोकिया 5.1 प्लस या स्मार्टफोनची किंमत कंपनीच्या वेबसाईटवर 10, 999 रुपये आहे. तर फ्लिपकार्टवर हा फोन 10,499 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच या स्मार्टफोन अनेक आकर्षक ऑफर्स आणि सूट देण्यात आली आहे.  

Web Title: nokia giving free bluetooth wireless earphone purchase of nokia 3.1 nokia 5.1 and nokia 6.1