20 तासांच्या बॅटरी लाईफसह Nokia BH-805 इयरबड्स लाँच; जाणून घ्या किंमत
By सिद्धेश जाधव | Updated: July 12, 2021 16:59 IST2021-07-12T16:56:04+5:302021-07-12T16:59:46+5:30
Nokia BH-805 ची किंमत सुमारे 8,800 रुपये आहे, यात 13mm ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत.

20 तासांच्या बॅटरी लाईफसह Nokia BH-805 इयरबड्स लाँच; जाणून घ्या किंमत
Nokia ने ट्रू व्हायरलेस स्टीरियो (TWS) टेक्नॉलॉजीसह Nokia BH-805 ईयरबड्स लाँच केले आहेत. हे बड्स 20 तासांचा प्लेबॅक टाइम देतात. यात देण्यात आलेले 13 mm ऑडियो ड्रायव्हर स्टूडियो क्वालिटी साउंड देतात, असे कंपनीचे म्हणणे आहे. जेस्चर कंट्रोल आणि गुगल असिस्टंट अश्या दोन पद्धतीने हे बड्स वापरता येतात.
Nokia BH-805 ची किंमत
Nokia BH-805 ची किंमत EUR 99.99 (सुमारे 8,800 रुपये) ठेवण्यात आली आहे. हे ईयरबड्स चारकोल आणि पोलर सी रंगात युरोपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. Nokia BH-805 भारतात कधी दाखल होतील याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.
Nokia BH-805 चे स्पेसिफिकेशन्स
Nokia BH-805 मधील 13mm ड्रायव्हर्स अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) ला सपोर्ट करतात. यातील अॅम्बिएन्ट मोड तुम्हाला आजूबाजूच्या आवाजांसोबत म्युजिक ऐकण्याची मुभा देतो. प्रत्येक ईयरबड मधील 45mAh बॅटरीमुळे एकदा फुल चार्ज केल्यास पाच तासांचा प्लेबॅक टाइम मिळतो. चार्जिंग केसच्या मदतीने ईयरबड्सची एकूण बॅटरी लाईफ 20 तास होते. Nokia BH-805 मध्ये ब्लूटूथ v5.0, IPX5-रेटेड वॉटर रेजिस्टंस आणि Google Assistant सपोर्ट देण्यात आला आहे.