शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

वाढीव रॅमसह नोकिया 5 स्मार्टफोन : जाणून घ्या फीचर्स

By शेखर पाटील | Published: November 07, 2017 10:40 AM

एचएमडी ग्लोबल कंपनीने भारतात आपला नोकिया ५ हा स्मार्टफोन आता ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेजयुक्त व्हेरियंटच्या स्वरूपात सादर करण्याची घोषणा केली आहे.

नोकियाने या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात बार्सिलोना येथील मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकिया ३, नोकिया ५ आणि नोकिया ६ हे तीन स्मार्टफोन लाँच केले होते. यानंतर हे तिन्ही मॉडेल्स भारतीय ग्राहकांसाठी जून महिन्यात सादर करण्यात आले होते. यातील नोकिया ५ हा स्मार्टफोन २ जीबी रॅम आणि १६ जीबी इनबिल्ट स्टोअरेजच्या स्वरूपात १२,४९९ रूपयात सादर करण्यात आला होता. आता याचे ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असणारे व्हेरियंट १३,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. यातील स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. मॅट ब्लॅक आणि टेंपर्ड ब्ल्यू या दोन रंगांच्या पर्यायात हा स्मार्टफोन आजपासून फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. तर १४ नोव्हेंबरनंतर हा स्मार्टफोन देशभरातील शॉपीजमधूनही खरेदी करता येणार आहे.

नोकिया ५ या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर देण्यात आलेला आहे. यात फेज डिटेक्शन, ऑटो-फोकस आणि ड्युअल एलईडी फ्लॅशयुक्त १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या मदतीने एचडी व्हिडीओ रेकॉर्डींग करता येणार आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. तर यातील बॅटरी ३००० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. ही बॅटरी युएसबी टाईप-सी केबलच्या मदतीने चार्ज करता येईल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१.१ नोगट आवृत्तीवर चालणारा असला तरी लवकरच याला ओरिओ या आवृत्तीचे अपडेट देण्यात येणार असल्याची माहिती एचएमडी ग्लोबलतर्फे देण्यात आली आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल