सियोल : तंत्रज्ञानाच्या बाबतीत कैक मैल पुढे असलेल्या अमेरिका, चीन, रशियाने नाही तर दक्षिण कोरियासारख्या छोट्याशा देशाने जगात पहिल्यांदा 5 जी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी रात्री 11 वाजता देशवासियांसाठी 5 जी लाँच करण्यात आले. 


दक्षिण कोरियाने यापूर्वी 5 एप्रिल ही देशात 5जी सेवा सुरु करण्यासाठी तारिख निश्चित केली होती. मात्र, अमेरिकी कंपन्यांना हरवण्यासाठी दोन दिवस आधीच ही सेवा सुरु करण्यात आली. 4जीच्या तुलनेत 5जी 20 पटींनी वेगवान असणार आहे. 


दक्षिण कोरियाच्या टॉपच्या टेलिकॉम कंपन्या एसके, केटी आणि एलजी यूप्लस यांनी 5जी सेवा देशभरात देण्यास सुरुवात केली. कोरियाच्या 6 महत्वाच्या सेलिब्रिटींनी त्यांच्या फेनवर ही सेवा सुरु केली. यामध्ये पॉप बँडस् ईएक्सओचे दोन सदस्यांसह ऑलिंपिक आईस स्केटींगपटू किम यू ना सहभागी होते. सर्वसामान्यांना शुक्रवारपासून ही सेवा वापरता येणार आहे.


सॅमसंगच्या नव्या गॅलेक्सी एस10 5जी मॉडेलवर पहिल्यांदाच 5जीची सेवा सुरु करण्यात आली. सॅमसंगही देखील कोरियाचीच कंपनी आहे. सॅमसंगने फेब्रुवारीमध्ये हा फोन लाँच केला होता. या फोनची किंमत 2 हजार डॉलर आहे. 


नव्या 5जी सेवेमुळे देशात ड्रायव्हरलेस कारसारख्या क्षेत्रांना गती मिळण्याची अपेक्षा कोरियाला आहे. यामुळे आर्थिक विकासालाही गती मिळेल. दक्षिण कोरिया अर्थव्यवस्थेची गती सारखी धीमी होत आहे. 2018 मध्ये आर्थिक स्तर सहा वर्षांपेक्षा खाली आला होता.

हे देश होते स्पर्धेत
5जी सेवा सर्वप्रथम सुरु करण्यासाठी चीन, अमेरिका आणि द. कोरियामध्ये स्पर्धा सुरु होती. अमेरिकेची टेलिकॉम कंपनी व्हेरिझॉन दोन शहरांमध्ये 11 एप्रिलपासून 5 जी सेवा सुरु करणार आहे. तर चीनच्या काही शहरांमध्ये अद्याप ट्रायल सुरु आहे. 
द. कोरियाने 5जी सेवेच्या जाहिरातीसाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. एसके टेलिकॉमला 2019च्या शेवटी 10 लाखांहून अधिक ग्राहक जोडले जाण्याची आशा आहे. त्यांच्याकडे सध्या 4जीसाठी 2.7 कोटी ग्राहक आहेत. तर केटी कॉर्प 4जी पेक्षा स्वस्त प्लान देणार आहे.

 

English summary :
South Korea, started the 5G service for the first time in the world. 5G was launched for the people at 11 o'clock on Wednesday (5 April 2019) night. Samsung's new Galaxy S 10 5G model was launched for the first time with 5G. Samsung is also a Korean company.


Web Title: no America, nor China; South Korea became the worlds first 5G service provider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.