Samsung नं लाँच केला शानदार 4K Smart TV, अ‍ॅमेझॉन प्राईम आणि हॉटस्टारचं सब्सस्क्रिप्शन मोफत 

By सिद्धेश जाधव | Published: June 14, 2022 10:36 AM2022-06-14T10:36:16+5:302022-06-14T10:37:05+5:30

सॅमसंगनं भारतात 43 इंचाचा नवीन Crystal 4K Neo TV लाँच केला आहे. ज्यात गेमिंगसाठी खास मोड देण्यात आला आहे.  

New Samsung crystal 4k neo 43 inch tv launched in india  | Samsung नं लाँच केला शानदार 4K Smart TV, अ‍ॅमेझॉन प्राईम आणि हॉटस्टारचं सब्सस्क्रिप्शन मोफत 

Samsung नं लाँच केला शानदार 4K Smart TV, अ‍ॅमेझॉन प्राईम आणि हॉटस्टारचं सब्सस्क्रिप्शन मोफत 

googlenewsNext

Samsung नं भारतातील आपला स्मार्ट टीव्ही पोर्टफोलियो वाढवलं आहे. कंपनीनं आपल्या Samsung Crystal 4K Neo TV रेंजमध्ये 43 इंचाच्या मॉडेलची भर टाकली आहे. हा टीव्ही क्रिस्टल क्लियर पिक्चर क्वॉलिटी ऑफर करतो. या टीव्हीमध्ये गेमर्ससाठी खास लो लेटेन्सी गेम मोड देण्यात आला आहे. तसेच यात व्हॉइस असिस्टंट, स्क्रीन मिररिंग आणि HDR10+ असे फीचर्स देण्यात आले आहेत.  

किंमत आणि ऑफर्स  

या टीव्हीची किंमत 35,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा टिव्ह कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर देखील उपलब्ध होईल. हा टीव्ही विकत घेणाऱ्या ग्राहकांना एक वर्षाचं अ‍ॅमेझॉन प्राईम आणि डिज्नी+ हॉटस्टार सब्सक्रिप्शन मोफत मिळेल. ही ऑफर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.  

स्पेसिफिकेशन्स 

Samsung Crystal 4K Neo TV मध्ये 43 इंचाचा अल्ट्रा एचडी डिस्प्ले आहे. जो पिक्चर क्वॉलिटीसाठी क्रिस्टल टेक्नॉलजीसह HDR10+, वन बिलियन ट्रू कलर्स आणि क्रिस्टल 4K प्रोसेसरला सपोर्ट करतो. दमदार साउंड आउटपुटसाठी या टीव्हीमध्ये कंपनी डॉल्बी डिजिटल प्लससह स्मार्ट अडॅप्टिव्ह साउंड फीचर देण्यात आला आहे. जे टीव्हीवरील कंटेन्टनुसार साउंड अ‍ॅडजस्ट करतं. 

या टीव्हीमध्ये विविध मोड देण्यात आले आहेत. यात गेमिंगसाठी ऑटो गेम मोड आणि मोशन अ‍ॅक्सेलरेटर मिळतो. तसेच या टीव्हीमध्ये म्यूजिक प्लेयर देण्यात आला आहे, ज्याचा वापर म्यूजिक सिस्टमप्रमाणे करता येईल. या टीव्हीमध्ये पीसी मोड देखील आहे, जो स्मार्ट टीव्हीला एका पीसीमध्ये रूपांतरित करतो.    

सॅमसंगच्या या लेटेस्ट 4K टीव्हीमध्ये गुगल असिस्टंटसह बिक्सबी आणि अ‍ॅलेक्सा सपोर्ट देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये कंपनी यूनिवर्सल गाईड देखील देते. युजर्स एक्सपीरियंस सुधारण्यासाठी स्क्रीन मिररिंग फीचर देण्यात आलं आहे आणि हे इंटरनेटविना देखील चालतं. कनेक्टिव्हिटीसाठी टीव्हीमध्ये तीन HDMI पोर्ट आणि एक यूएसबी पोर्ट व्यतिरिक्त सर्व स्टँडर्ड ऑप्शन मिळतात.  

Web Title: New Samsung crystal 4k neo 43 inch tv launched in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.