शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

नवीन मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो भारतात दाखल

By शेखर पाटील | Published: February 23, 2018 11:09 AM

मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपला सरफेस प्रो हा टॅबलेट विविध व्हेरियंटमध्ये भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्य ६४,९९९ रूपयांपासून सुरू होणारे आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपला सरफेस प्रो हा टॅबलेट विविध व्हेरियंटमध्ये भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्य ६४,९९९ रूपयांपासून सुरू होणारे आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने गेल्या वर्षी जागतिक बाजारपेठेत आपल्या सरफेस प्रो या लॅपटॉपची नवीन आवृत्ती लाँच केली होती. आता हे मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहे. यात १२.३ इंच आकारमानाचा पिक्सलसेल (१८२४ बाय २७३६ पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले १६५ अंशापर्यंत वाकवून वापरणे शक्य आहे. हे मॉडेल विंडोज १० प्रो या प्रणालीवर चालणारे असेल. यासोबत नवीन अलकांट्रा हा अतिशय उत्तम दर्जाची कि-बोर्डही प्रदान करण्यात आला आहे. याच्या विविध व्हेरियंटमध्ये अतिशय गतीमान असे इंटेलचे प्रोसेसर प्रदान करण्यात आले आहेत. याची रॅम ४/८/१६ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८/२५६/५१२ जीबी व एक टिबी या पर्यायांमध्ये प्रदान करण्यात आले आहे. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १३.५ तासांपर्यंत चालत असल्याचा दावा मायक्रोसॉफ्टतर्फे करण्यात आला आहे. ऑटो-फोकसच्या सुविधेसह याच्या मागील बाजूस ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा प्रदान करण्यात आला आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या नवीन सरफेस प्रो या मॉडेलचे विविध व्हेरियंट आणि त्यांचे मूल्य खालीलप्रमाणे आहे.

१) इंटेल कोअर एम३ प्रोसेसर, इंटेल एचडी ६१५ ग्राफीक प्रोसेसर, ४ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेज- मूल्य ६४,९९९ रूपये.

२) इंटेल कोअर आय५ प्रोसेसर, इंटेल एचडी ६२० ग्राफीक प्रोसेसर, ४ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेज- मूल्य ७९,९९९ रूपये.

३) इंटेल कोअर आय५ प्रोसेसर, इंटेल एचडी ६२० ग्राफीक प्रोसेसर, ८ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोअरेज- मूल्य १,०६,९९९ रूपये.

४) इंटेल कोअर आय७ प्रोसेसर, इंटेल आयरिस प्लस ६४० ग्राफीक प्रोसेसर, ८ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोअरेज- मूल्य १,३३,९९९ रूपये.

५) इंटेल कोअर आय७ प्रोसेसर,इंटेल आयरिस प्लस ६४० ग्राफीक प्रोसेसर, १६ जीबी रॅम/५१२ जीबी स्टोअरेज- मूल्य १,८२,९९९ रूपये.

नवीन सरफेस प्रो या मॉडेलसोबत मायक्रोसॉफ्ट कंपनीने अतिशय उत्तम दर्जाचा नवीन पेनदेखील लाँच केला आहे. याच्या मदतीने या मॉडेलच्या डिस्प्लेवर अतिशय सुलभरित्या रेखाटन करता येणार आहे. याचे मूल्य ७,९९९ रूपये इतके आहे. तर उर्वरित अ‍ॅसेसरीजमध्ये सरफेस आर्क माऊस-६,३९९ रूपये; सरफेस प्रो टाईप कव्हर (काळा)-१०९९९ रूपये आणि सरफेस प्रो टाईप कव्हर (प्लॅटीनम)-१२,९९९ रूपये आदींचा समावेश आहे. नवीन सरफेस प्रो तसेच ही अन्य अ‍ॅसेसरीज भारतीय ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये खरेदी करता येणार आहे.