फेसबुककडून ब्रँडस् साठी नवे मेसेजिंग व बिझनेस फिचर; ऑनलाइन शॉपिंगला देणार नवे वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 10:00 AM2021-09-18T10:00:57+5:302021-09-18T10:02:00+5:30

साेशल मीडियामध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुककडून सातत्याने नवे फिचर्स सादर केले जातात.

new messaging and business features for brands from Facebook pdc | फेसबुककडून ब्रँडस् साठी नवे मेसेजिंग व बिझनेस फिचर; ऑनलाइन शॉपिंगला देणार नवे वळण

फेसबुककडून ब्रँडस् साठी नवे मेसेजिंग व बिझनेस फिचर; ऑनलाइन शॉपिंगला देणार नवे वळण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : साेशल मीडियामध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुककडून सातत्याने नवे फिचर्स सादर केले जातात. युझर्सना त्यामुळे फेसबुक वापरताना वेगळी अनुभूती मिळते. आता फेसबुकने व्यवसायाभिमुख मेसेजिंग फिचर विकसित केले आहे. फेसबुकच्या माध्यमातून व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विविध व्यवसायांना त्यातून संभाव्य ग्राहकांना शाेधून त्यांच्याशी चॅट करता येईल.

फेसबुकला युझर्ससाठी ऑनलाइन शाॅपिंगचे ठिकाण बनविण्यासाठी कंपनीने नवे फिचर विकसित केले आहे. त्यातून डिजिटल जाहिरातदारांना ग्राहकांना वैयक्तिक ऑफर्स देता येणार आहेत. त्यामुळे युझर्सना ऑनलाइन शाॅपिंगचा वेगळा अनुभव मिळेल. फेसबुकचे बिझनेस प्राॅडक्ट विभागाचे उपाध्यक्ष करणदीप आनंद यांनी याबाबत माहिती दिली.

फेसबुकवर असलेल्या व्यवसायांना त्यांच्या इंस्टाग्राम प्राेफाईलवर चॅटसाठी एक वेगळे बटन जाेडता येणार आहे. त्यावर क्लिक केल्यास युझर्स व्हाॅट्सॲपवरून त्यांना संपर्क साधता येऊ शकेल. या फिचरसाठी भारत आणि ब्राझील यासारख्या देशांमध्ये व्हाॅट्सॲप इंटीग्रेशन अतिशय महत्त्वाचे आहे, असे आनंद म्हणाले. फेसबुकचा वापर करणाऱ्या कंपन्यांसाठी आणखी एका फिचरची चाचणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. विविध ब्रँड्सना फेसबुक बिझनेस लाईटच्या माध्यमातून ईमेल पाठविता येणार आहे. त्यातून कंपन्यांना ग्राहकांपर्यंत पाेहाेचणे अधिक सुलभ हाेणार आहे. 

फेसबुककडून वर्क अकाउंटच्या फिचरचीही चाचणी करण्यात येणार आहे. बिझनेस पेजेसचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या फिचरमुळे वैयक्तिक खात्यांमध्ये लाॅगिन करण्याची गरज पडणार नाही.

व्हाॅट्सॲपने दिली बिझनेस डिरेक्टरी

- साेशल मेसेजिंग ॲप व्हाॅट्सॲपने एक नवे फिचर लाँच केले आहे. युझर्सना ॲपमध्ये बिझनेस डिरेक्टरी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यातून युझर्सना विविध दुकाने, सेवा इत्यादींना थेट संपर्क करता येणार आहे. हे फिचर सध्या ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आले आहे. 

- व्हाॅट्सॲपवर जाहिराती नसतात. मात्र, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जाहिरातदारांसाेबत युझर्स व्हाॅट्सॲपवर चॅट करू शकताे. आता युझर्सना बिझनेस डिरेक्टरीच्या माध्यमातून थेट संपर्क साधणे सुलभ होईल.

Web Title: new messaging and business features for brands from Facebook pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.