मनोरंजनाचा नवा प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टार लाँच; तुमच्या मोबाईलमधील Jio Cinema, Disney+ Hotstar चे काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:13 IST2025-02-14T12:11:43+5:302025-02-14T12:13:00+5:30
जगातील सर्वात मोठ्या मनोरंजन कंपन्यांपैकी एक असलेल्या Disney+ Hotstar ने आपला भारतातील व्यवसायचा रिलायन्सच्या जिओस्टारसोबत सामंजस्य करार केला होता. ...

मनोरंजनाचा नवा प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टार लाँच; तुमच्या मोबाईलमधील Jio Cinema, Disney+ Hotstar चे काय होणार?
जगातील सर्वात मोठ्या मनोरंजन कंपन्यांपैकी एक असलेल्या Disney+ Hotstar ने आपला भारतातील व्यवसायचा रिलायन्सच्या जिओस्टारसोबत सामंजस्य करार केला होता. आजपासून जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टार दोन्ही एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले आहेत.
युजरना त्यांच्या मोबाईलवर हॉटस्टार हे अॅप आता जिओ हॉटस्टार म्हणून दिसू लागले आहे. हे अॅप सुरु केल्यावर तुम्हाला काही परमिशन विचारल्या जात आहेत. ते झाल्यानंतर तुम्हाला त्यावर जिओ सिनेमा आणि हॉटस्टारचा कंटेट दिसणार आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आमच्या मोबाईलमध्ये जिओ सिनेमा हे अॅपही आहे आणि हॉटस्टारही आहे. मग काय करायचे. तर तुम्ही जर जिओ सिनेमा उघडले तर तुम्हाला जो व्हिडीओ पहायचा आहे तो निवडल्यावर जिओ हॉटस्टार अॅपवर वळते केले जात आहे. यामुळे आता तुम्हाला जिओ सिनेमा अॅपची गरज राहणार नाही.
तुम्ही जिओ सिनेमावर पाहत असलेल्या वेब सिरीज किंवा अन्य काही जसेच्या तसे मध्यातून जिओ हॉटस्टारवर ट्रान्सफर होणार आहेत. म्हणजेच तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून तुम्ही जो सध्या पाहत होता त्या पार्टवर जाण्याची गरज राहणार नाही. तुम्ही दोन्ही अॅपची सबस्क्रीप्शन घेतली असतील तर ती सुरुच राहणार आहेत. जर तुम्ही हॉटस्टारचे सबस्क्रीप्शन घेतले असेल तर त्यावर तुम्ही सिनेमाचा कंटेंटही पाहू शकणार आहात. अद्याप तरी हॉटस्टारच्या आधीच्याच सबस्क्रीप्शनच्या किंमती ठेवण्यात आलेल्या आहेत. भविष्यात त्या वाढण्याची शक्यता आहे. कदाचित तुम्हाला जिओ सिनेमाचे सबस्क्रीप्शन बंद करावे लागण्याची शक्यता आहे. ज्यांनी पैसे भरलेत ते नॉन रिफंडेबल असल्याचे सांगितले जात आहे.