शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तंत्रज्ञानाची कमाल! आता इंटरनेट आणि ब्लूटूथशिवाय दुसऱ्या डिव्हाईसशी कनेक्ट करा फोन, गुगलने आणलं 'हे' नवं App

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 13:09 IST

Google WifiNanScan App : गुगलने स्मार्टफोन आपापसात कनेक्ट करण्यासाठी एक नवीन पद्धत आणली आहे.

नवी दिल्ली - लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलने (Google) स्मार्टफोन आपापसात कनेक्ट करण्यासाठी एक नवीन पद्धत आणली आहे. गुगलने आपलं एक नवं अ‍ॅप लाँच केलं असून WifiNanScan असं या अ‍ॅपचं नाव आहे. 9to5Google च्या रिपोर्टनुसार, WifiNanScan अ‍ॅप सध्या डेव्हलपर्ससाठी बनवण्यात आलं आहे, ज्याद्वारे ते वायफायसह एक्सपेरिमेंट करू शकतात. वायफाय Aware एक Neighbour Awareness Networking आहे जे स्मार्टफोन युजर्सला एक-दुसऱ्याशी कनेक्ट करण्यासाठी मदत करतात.

एकमेकांशी कनेक्ट करण्यासाठी स्मार्टफोन अँड्रॉईड 8 किंवा त्यावरील व्हर्जनवर चालवणं गरजेचं आहे. या अ‍ॅपच्या मदतीने दोन स्मार्टफोन युजर्स विना कोणत्याही कनेक्टिविटी शिवाय ब्लूटूथ आणि इंटरनेटशिवाय एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात. API सर्व जवळपासच्या नेटवर्कच्या मदतीने कनेक्ट होतं आणि त्याचं एक नेटवर्क तयार करतं. ज्याद्वारे युजर्स डेटा किंवा मेसेज शेअर करू शकतात.

आसपास उपलब्ध असलेल्या डिव्हाईसला कनेक्ट करण्यासाठी वाय-फाय अवेर ही सुविधा एक चांगला पर्याय असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच WifiNanScan अ‍ॅपद्वारे वापरण्यात आलेल्या नेटवर्कच्या मदतीने युजर्स सुरक्षितरित्या प्रिंटरवर आपले डॉक्युमेंट पाठवू शकतात. हे सर्व विना कोणत्याही नेटवर्कमध्ये लॉग-इन केल्याशिवाय होईल. इंटरनेट कनेक्शनशिवाय तुम्ही कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये रिझर्वेशन करू शकता. हे सर्व विना इंटरनेट कनेक्शन होऊ शकतं.

गुगल प्ले स्टोरमधून हे अ‍ॅप डाऊनलोड करता येऊ शकतं. अ‍ॅप 1 मीटरपासून 15 मीटरपर्यंत काम करतं. डेव्हलपर्स, OEMs आणि रिसर्चर्स या टूलचा वापर करून रेंज आणि डिस्टेंसला मॉनीटर करू शकता. याचा वापर हा पीयर टू पीयर रेंजिंग आणि डेटा ट्रान्सफर, फाईंड माय फोन आणि वायफाय अवेर किंवा NAN API बेस्ड कॉन्टेस्क्स्ट अवेअर अ‍ॅप्लिकेशनसाठी केला जाऊ शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अरे व्वा! ...तर 5G सारखा होईल तुमच्या 4G इंटरनेटचा स्पीड; जाणून घ्या नेमकं कसं? 

स्मार्टफोन युजर्सच्या संख्येत मोठी वाढ होत तर दुसरीकडे स्मार्टफोनवर डेटाचा वापर करण्यासाठी कंपन्या एका पेक्षा एक जबरदस्त डेटा प्लॅन्स ऑफर करत आहेत. तसेच युजर्सना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या नेटवर्कला मजबूत करण्यासाठी कंपन्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत. अनेक कंपन्या आपल्या स्मार्टफोनला 4G VoLTE सपोर्टसह लाँच करत आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी नेटवर्कची समस्या वाढते आहे. त्यामुळे इंटरनेट स्पीडमध्ये काम करत नाही. इंटरनेट स्पीड कमी असल्याची अनेकांची तक्रार असते. मात्र काही सोप्या पद्धतीने फोनचा इंटरनेट स्पीड वाढवता येतो. जाणून घेऊया कसं...

सर्वप्रथम फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. सेटिंग्समध्ये गेल्यावर नेटवर्क सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करा. येथे प्रीफर्ड टाईप ऑफ नेटवर्क या पर्यायावर जावून 4G किंवा LTE सिलेक्ट करा. नेटवर्क सेटिंग्समध्ये एक्सेस पॉइंट नेटवर्क (APN) सेटिंग चेक करावी लागेल. जर योग्य APN निवडला नाही, तर APN पर्यायात सेटिंग्जला डिफॉल्ट सेट करावं लागेल. फोनमध्ये असलेले Apps देखील इंटरनेट स्पीड कमी करतात. अनेकदा Apps बॅकग्राउंडमध्ये सुरू असतात आणि डेटाही खर्च होत राहतो. डेटाचा वापर कमी करण्यासाठी व्हिडीओजचा ऑटो प्ले मोड बंद करा. तसंच Apps मध्ये मीडिया फाईल्सचं ऑटो डाऊनलोडही बंद करा.

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

टॅग्स :googleगुगलInternetइंटरनेटtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन